कासव शर्यतीत एकदा जिंकले म्हणून त्याने इतका आव आणायचा नसतो : सुधीर मूनगटीवार
कासव शर्यतीत एकदा जिंकले म्हणून त्याने इतका आव आणायचा नसतो : सुधीर मुनगंटीवार
शरद पवार राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराच्या पराभवानंतर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला :
राज्यात विधान परिषदेची आज निवडणूक झाली. विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले,विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले आणि यात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले.भाजपचे ४, शिंदेंच्या शिवसेनेचे २, तर अजितदादांचे २, उमेदवार पहिल्या फेरीत निवडून आले. भाजपच्या पाठिंब्याचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मते घेऊन विजयी झाले. महाविकास आघाडीतून कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव सहज विजयी झाल्या, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर देखील निवडून आले. शरद पवार राष्ट्रवादी पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला मारला.