फटाक्यांच्या आतिषबाजीत दुसरबीडमध्ये पालखीचे स्वागत
फटाक्यांच्या आतिषबाजीत दुसरबीडमध्ये पालखीचे स्वागत
फटाक्यांच्या आतिषबाजीत दुसरबीडमध्ये पालखीचे स्वागत
सिंदखेडराजा प्रतिनिधी दि.४ ऑगस्ट
श्री संत गजानन महाराज शेगाव पालखीचे दुसरबीड येथे आज दुपारी ३ वाजता आगमन झाले. यावेळी तढेगाव फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीने चहा पाण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मांदियाळी फुलली होती. तेथून समोर दुसरबीड टोल नाक्यावर येथील व्यापारी मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.
दुसरबीड नगरीमध्ये पालखी दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व बँड पथकांच्या सहाय्याने पालखींचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात नाहून निघाला होता. हजारो भक्तांच्या तसेच राजकीय सामाजिक, वाणिज्य, शैक्षणिक अधिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या वतीने श्रींच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच गावातील भजनी मंडळांनी पालखीसोबत गावाच्या बाहेर जाऊन पालखीला पुढील मार्गासाठी रवानगी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, माजी पंचायत समिती सभापती विलासराव देशमुख, सरपंच शरदराव मखमले,माजी सरपंच प्रकाश सांगळे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष वैभव देशमुख, गजेंद्र देशमुख, गजानन देशमुख,
सुधीर निकम, निवृत्ती वायाळ, वसंतराव उदावंत, दिलीपराव देशमुख,पंकज जाधव, पिंपळगाव कुडा सरपंच बबनराव कुडे, कॉंग्रेसचे जुनेद अली,कचरूजी भारस्कर, सुनील जायभाये, तढेगावचे सरपंच मनोहर दराडे, तंटामुक्ती अध्यक्ष याकुब शेख, रामेश्वर पवार,अनंता जाधव, संतोष दराडे, कैलास मांटे, भाजपा युवा मोर्चाचे दीपक घुगे, संजय घुगे यांनी पालखीत सहभागी होऊन स्वागत करत मार्गस्थ करण्यासाठी मदत केली. पालखीचा पुढील मुक्काम हा आज बीबी येथे राहणार असून पालखीच्या वेळी किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोईफोडे, शिवाजी बारगजे, अब्दुल परसुवाले,सुभाष गिते
यांनी चोख बंदोबस्त ठेवला
आज सकाळपासून दुसरबीड परिसरातून पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी व दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे परिसराराला जत्रेचे स्वरूप आले होते. त्यानुषंगाने पालखी सोहळ्यानंतर पालखी मार्गावरील कुडाकचरा व स्वच्छता मोहिम येथील नारायणराव नागरे महाविद्यालया तर्फे राबवण्यात आली. यावेळी भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवराज कायंदे, जऊळका सरपंच गजानन मुंढे, देवानंद नागरे, नयना गवारे,सत्यम श्रीवास्तव, गजानन राठोड यांनी मोहिम राबविली.