Uncategorized

ग्रामपंचायत कार्यालय हेर मासिक सभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून १५ व्या वित्त आयोगाची रक्कम हाडपली.

ग्रामपंचायत कार्यालय हेर मासिक सभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून १५ व्या वित्त आयोगाची रक्कम हाडपली.

ग्रामपंचायत कार्यालय हेर मासिक सभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून १५ व्या वित्त आयोगाची रक्कम हाडपली.

उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार,

 

सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानीला सदस्य कंटाळले.

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी :

उदगीर तालुक्यातील हेर येथिल ग्रामपंचायत कार्यालयाच्या मासिक सभेतील ठरावाला केराची टोपली दाखवत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मनमानी करुन काम पुर्ण न करताच पंधराव्या वित्त आयोगातून रक्कम उचलून भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील उपसरपंच व न ऊ सदस्यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. हेर येथील ग्रामपंचायत मार्फत जलजीवन कामात सरमिसळ करुन वाढिव कामाच्या नावाखाली पंधराव्या वित्त आयोगाचा वापर करुन गावाअंतर्गत पाईप लाईन करण्यात आली आहे.त्या पाईपलाईनच व नळजोडणी कामाचा आराखडा नावालाच असून प्रत्यक्षात काम मात्र थोडकेच आहे.आराखड्यानुसार काम पुर्ण न करता थोडकेच काम करुन केलेले काम चालू असलेल्या जलजीवन कामात घुसडून सरमिसळ करण्यात आली आहे.आराखड्यानुसार काम पुर्ण झाले असे दाखवून सरपंच व ग्रामसेवक यांनी पंधराव्या वित्त आयोगातून आठ लाख ८० हजार रुपये रक्कम उचलून घेऊन भ्रष्टाचार केला आहे.दरम्यान काम चालू असताना दि.२४ जून रोजी ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली होती.त्या बैठकीत या कामाची चर्चा होऊन हे काम आराखड्यानुसार पुर्ण केल्याशिवाय बिल अदा करु नये असा ठराव बहुमताने पारीत करण्यात आला होता.ठराव पारीत झाल्यानंतरही या ठरावाला केराची टोपली दाखवत ग्रामसेवक व सरपंच यांनी अभियंता व गटविकास अधिकारी यांच्या मदतीने बिले उचलून या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे.हे काम जलजीवनचे असताना व जलजीवनचे काम चालू असतानाच या वाढिव कामाची गरजच कशाला पडावी असा प्रश्न उद्भवतो.परंतू जलजीवनच्या कामात मिसळामिसळ करुन पंधराव्या वित्त आयोगातील रक्कम घशात घालण्याचा घाट घालून या कामाचे नाटक करण्यात आले व थोडकेच काम करुन जास्तीचे काम दाखवून बिल उचलण्यात आले आहे.याबाबत उपसरपंच तुळशीराम बेंबडे, व ईतर नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी व जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुन या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच तुळशीराम बेंबडे, उपसरपंच हेर महाराष्ट्र मिडियाशी संवाद साधला असता म्हणाले की ग्रामपंचायत कार्यालय हेर येथे मासिक सभेचा ठराव असताना त्या ठरावाला केराची टोपली दाखवून सरपंच व ग्रामसेवक मनमानी करुन परस्पर मासिक सभेच्या परवानगी शिवाय बिल उचलून घेत असतील तर या मासिक सभेला अर्थच राहिला नसून मासिक सभा व ग्रामपंचायत सदस्यांची गरजच कशाला आहे. हे उघड -उघड लोकशाहीचा अपमान असून या मनमानीला आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. घडलेल्या प्रकाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button