जिल्हास्तरीय अशासकीय समिती पोहचली आता खेडो-पाड्यातील वाडी तांड्या पर्यंत…
जिल्हास्तरीय अशासकीय समिती पोहचली आता खेडो-पाड्यातील वाडी तांड्या पर्यंत...
जिल्हास्तरीय अशासकीय समिती पोहचली आता खेडो-पाड्यातील वाडी तांड्या पर्यंत…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
महाराष्ट्र शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या आहेत मात्र आजही तांड्यावरील बंजारा लमान समाज विकासापासून कोसो दूर असल्याने वाडी तांड्याचा मनावा तेवढा विकास न झाल्याने वाडी तांड्याचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून लमान समाजाचा विकास साधण्यासाठी लमान समाजाचा मुख्य प्रवाहात आणून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तांडा वस्ती गावठाण महसुली गावाचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे अशा विविध योजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून आराखडे मागवण्याची प्रक्रिया नुकतीच हाती घेतलेली आहेत त्यात जिल्हा परिषद समिती चे सदस्य अर्जुन शिवाजीराव जाधव यांनी निलंगा, दापका, मुबारकपूर, झरी, राठोडा, सीता नगर,मानसिंग नगर,झरी,केळगाव, लांबोटा,अंबुलगा देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तांडा वाडी वस्ती वरती प्रवास करून बंजारा बांधवांची बैठक आयोजित करून संवाद व शैक्षणिक सामाजिक आरोग्य अशा इतर विषयावरती चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजना या योजनेचे पुस्तक वाटप करून योजनेच्या संदर्भामध्ये समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तांड्यातील नायक,कारभारी, मंदिराचे पुजारी, माता भगिनी व मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.