कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरेगाव येथे जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरेगाव येथे जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरेगाव येथे जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते करण्यात आले. या बाजाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी सुविधा प्राप्त होणार आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकरी वर्गाला कायमच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच पावलावर पाऊल टाकत माथाडी कामगाराचा पोरगा म्हणून शेतकरी बांधवांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न मी स्वतःहून करत आहे. आज या भव्य दिव्य अशा बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होईल. या पुढील काळात देखील शेतकरी वर्गाला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असा विश्वास दिला.
प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, सचिव संताजी यादव आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते.
*आमदार :- मा.श्री.शशिकांतजी शिंदे साहेब.*