लातूर प्रतिनिधि :
लातूर जिल्हयातील स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, लातूर येथे इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अरविंद राजाभाऊ खोपे (रा. पांगरी ता. परळी) याचा आकस्मिक मृत्यू झाला, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नव्हती, त्या निष्पाप मुलाच्या मृत्यू बद्दल वसतिगृह प्रशासनाकडून पालकाला उत्तर मिळत नव्हते, कुठलाही गुन्हा कोण्या एका जागेवर घडला असेल तर ज्या जागेवर गुन्हा घडला असेल तर त्या जागेच्या मालकाने कमीतकमी समोर येऊन जबाबदारीने सांगितलं पाहिजे, की तो यात दोषी आहे की नाही आहे, आणि हे त्याला स्पष्ट करने भागच आहे. यात जर ती गुन्हा घडलेली जागा एका शाळेचं वसतिगृह असेल तर त्या संस्था चालकाची, प्रशासनाची जबाबदारी खूप मोठी होते, यात सर्व शाळा बंद करून कोणालाही उत्तरे न देता पळ काढून जाण्याचा प्रयत्न करता, सर्व झालेला गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करता तर मग तूम्ही त्यात गुन्हेगार असणारच.. ?
अख्खा दिवस त्या मुलाच्या आईने तिच्या एकुलत्या एक मुलासाठी न्याय पाहिजे असे हंब्रून रडत होती,माझ्या मुलाच्या मृत्यूला जो कोणी कारणीभूत आहे त्याला अटक व्हावी म्हणून त्या मुलाचा मृतदेह वस्तीगृहाच्या कार्यालय मध्ये ठेवून वस्तीगृहाच्या दरवाजा पाशी ढसाढसा रडत होती पण माणुसकी संपलेल्या असंवेदनशील वस्तीगृह प्रशासनाला थोडीही तिची यातना कळली नाही.
माझ्या एकुलत्या एक मुलाला माझ्या पासून दूर ठेवून तुमच्याकडे मी शिकायला पाठविले होते, त्याला मारून टाकण्यासाठी नाही म्हणून टाहो फोडणाऱ्या त्या काळीज पिळून टाकणाऱ्या विवंचनेने ना वस्तीगृहातील प्रशासनाला जाग आली नाही, त्या मातेला न्याय मिळेल का नाही हे खूप लांबची गोष्ट आहेत, असे सर्वांना वाटत होते पण लातूर मधील या घटनेवरून लक्षात येते आहे की अन्यायाविरोधात बोलणाऱ्यांची संख्या कमी आणि संवेदनशीलता संपलेल्या गिधाडांची संख्या जास्त झालेली आहे की काय अशी जनतेत चर्चा सुरू होती. असे या घडलेल्या प्रकरणावरून दिसून येते परंतू त्या मुलाचे शवविच्छेदन चाचणी करण्यात आली असता त्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली असे निदर्शनास येत आहे परंतू वास्तव परिस्थिती नेमकी काय आहे हे कोणालाच कळायला मार्ग नाही.