मोबाईल व्हाट्सअप च्या माध्यमातून जनतेची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी
मोबाईल व्हाट्सअप च्या माध्यमातून जनतेची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी
*मोबाईल व्हाट्सअप च्या माध्यमातून जनतेची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी*
मागील काही दिवसापासून आपल्या रिसोड तालुक्यामध्ये अनेक मोबाईल धारकाचे मोबाईल म्हणजेच मोबाईलचे अकाउंट हॅक करण्याचे प्रकार भरपूर वाढत आहे ज्यामध्ये सुरुवातीला मोबाईल व्हाट्सअप हा बंद होतो त्यानंतर मोबाईल धारकाच्या मोबाईलवर शासनाच्या अनेक योजना च्या नावावर मोबाईल धारकाला त्या प्रकारचा संदेश प्राप्त होतो लिंक प्राप्त होते आणि त्या लिंकला सुरू केल्यानंतर मोबाईल धारकाचा मोबाईल हॅक होतो आणि आपला स्वतःचा व्हाट्सअप हा दुसरा कोणीतरी वापरत असतो ज्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये असलेले रक्कम क्षणार्धात काढल्या जाते त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खाता असलेल्या शाखेमध्ये जाऊन चौकशी केली असता सदर शाखा व्यवस्थापक तुम्हाला सांगतात की तुमचा मोबाईल हॅक झाल्या कारणाने आपल्या खात्यातून रक्कम कोणीतरी काढून घेतली परंतु त्याचा शेवटपर्यंत कुठलाही सुगावा लागत नाही त्या कारणाने प्रत्येक नागरिकांनी आपल्या मोबाईल हॅक झाल्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत आपलं स्वयम घोषणापत्र व मोबाईल हॅक झाल्याबाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये देणे अनिवार्य आहे ज्यामुळे तुमच्या मोबाईल वरून कोणीही कुठली आक्षेपार्य पोस्ट करणे किंवा कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही व आपले बँक खाते सुद्धा रिकामे होणार नाही याबाबत प्रत्येक नागरिकांनी सुज्ञ राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी केले,