नगर परिषद प्रशासक मुख्याधिकारी व शहराचे मा.नगराध्यक्ष किरणदादा उटगे यांचे कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे आभार सत्कार संपन्न…
नगर परिषद प्रशासक मुख्याधिकारी व शहराचे मा.नगराध्यक्ष किरणदादा उटगे यांचे कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे आभार सत्कार संपन्न...
नगर परिषद प्रशासक मुख्याधिकारी व शहराचे मा.नगराध्यक्ष किरणदादा उटगे यांचे कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे आभार सत्कार संपन्न…
लातूर प्रतिनिधि:
औसा शहरातील श्री मुक्तेश्वर मंदिर रोड व या भागात असणाऱ्या सर्व कोचिंग क्लासेसच्या परिसरात मोटारसायकल वेगाने चालवून स्टंट करणाऱ्या टवाळखोर मुलांच्या वेगावर आळा बसावा यासाठी किरणदादा उटगे यांच्या पुढाकाराने तसेच गिरीशदादा उटगे यांच्या मार्गर्शना खाली सर्व कोचिंग क्लास संचालकाच्या वतीने नगरपालिका प्रशासनास दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्याधिकारी कोकरे यांनी या परिसरात गतिरोधक बसवून दिले व तसेच या भागातील सर्व पथदिवे चालू करून घेतले. येत्या 10 दिवसात हा परिसर CCTV च्या निगराणीमध्ये येईल असे आश्वासन मुख्याधिकारी कोकरे यांनी दिले.
तसेच या परिसरात मागील काहीं दिवसापासून काही रोड रोमियोंचा पण वावर वाढला होता. या संबंधी किरणदादा उटगे यांनी पोलिस निरीक्षक साहेब यांना माहिती देऊन पोलीस गस्त सुरू करण्यास विनंती केली. कोचिंग क्लासेस संघटनेच्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या प्रश्नाची दखल घेतली व प्रश्न सोडविल्याबद्दल संघटनेच्या वतीने किरणदादा उटगे, गिरीशदादा उटगे, मुख्याधिकारी कोकरे, तसेच औसा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रेजितवाड याचे आभार मानण्यात आले.
यावेळी औसा तालुका कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष मा.प्रा.अविनाश चव्हाण, प्रा.संदीप कुलकर्णी, प्रा.गंगापूरे, प्रा.वाकसे, प्रा.साखरे, प्रा.लद्दे,
प्रा.भुसनिकर ,प्रा.सोमवंशी व सर्व विद्यार्थी आभार व्यक्त करताना दिसत होते.