पोलीस कर्मचारी हप्ते घेऊन पाठराखण करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे अवैध धंदे बंद करण्यासाठी सरसावले
सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे अवैध धंदे बंद करण्यासाठी सरसावले
पोलीस कर्मचारी हप्ते घेऊन पाठराखण करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
प्रतिनिधी,अक्षय थोरात बारामती पुणे
माळेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा तसेच भरमसाठ हप्ते घेऊन या अवैद्य दारू विक्री व्यवसाय चालवणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पनदरे ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे यांनी केला आहे तसेच क कारवाई होती पण तुटपुंजी कारवाई करून आरोपीला लगेच जामीन ही मंजूर होते त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यां व्यवसायिकांना कोणतेही भय राहिलेले नाही.
सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे आरोप करतेवेळी म्हणाले की, माळेगाव पोलीस ठाण्यातील गेंड्याचे कातडीचे कर्मचारी हे भरमसाठ मोठ्या रकमेचा हप्ता एजंट मार्फत घेऊन अवैध्य व्यावसाय करणाऱ्यांची पाठराखण करीत आहे यामुळे युवा पिढी या व्यसनाला बळी पडून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत यास सर्वस्वी जबाबदार माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आहेत
भविष्यामध्ये अशा व्यसनांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांनी स्वतः या प्रकारामध्ये लक्ष घालून माळेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये चालणाऱ्या वैद्य व्यवसायांवर कडक कारवाई करून अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना तडीपार करावे तसेच हप्तेखोर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे देखील कोकरे म्हणाले