महाराष्ट्र ग्रामीण

प्रशासनानेच शिक्षकांची जुनी पेंशन हिरावली – डॉ.सौ.संगीता शिंदे

प्रशासनानेच शिक्षकांची जुनी पेंशन हिरावली - डॉ.सौ.संगीता शिंदे

प्रशासनानेच शिक्षकांची जुनी पेंशन हिरावली – डॉ.सौ.संगीता शिंदे

रास्ता रोको आंदोलना दरम्यान शेगाव पोलिसांची आंदोलनकर्त्यांना अटक

आंदोलनाचा आज ४ था दिवस

सिंदखेडराजा प्रतिनिधी दि.४ ऑगस्ट

२००५ पूर्वीच्या जुन्या पेंशन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही ७ ऑगस्ट रोजी असून शासनाने अद्यापपर्यंत शपथपत्र दाखल न केल्यामुळे शेगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाने आज आक्रमक रूप व पवित्रा धारण केला.

आंदोलनाच्या नेत्या डॉ.सौ.संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील पेंशन पीडित बांधव व भगिनी यांनी आज शेगाव येथे चक्काजाम आंदोलन करून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. भर पावसात जिवाचीही पर्वा न करता हे आंदोलन सुरू आहे. जुन्या पेंशनच्या घोषणांनी संत नगरी आज दुमदुमून गेली होती. आंदोलनाचे रूप पाहता शेगाव पोलिसांनी आज डॉ.सौ.संगीता शिंदे यांच्यासह अनेक पेंशनपीडित आंदोलकांना अटक केली.

पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसवून पेंशन पीडितांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. परंतु शिक्षक बांधवांनी तिथेही आपल्या घोषणा व प्रशासन विरोधातील रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ जुलै रोजीची घोषणा व १८ जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद यानुसार सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर न केल्याने आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ.सौ.संगीता शिंदे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button