अपरिचित इतिहास

राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने वरळी रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने वरळी रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेला प्रशासन आणि कंत्राटदार दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने वरळी रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच या मागणीची पूर्तता होण्यासाठी पक्षाच्यावतीने निवेदनही देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, सरचिटणीस मयूर केणी, इम्रान तडवी, अमोल हिरे, विशाल कनावजे, रोहित सावंत, राजीव शर्मा, जिल्हाध्यक्ष किरण राणे, इमरान खान, तालुकाध्यक्ष प्रसाद शेंडकर, नवनाथ सकपाळ, इमरान शेख, अक्षय खिल्लारी व प्रेम कुमार तायड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button