वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाने येरोळ येथील शेतकरी सापडले आर्थिक संकटात…
वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाने येरोळ येथील शेतकरी सापडले आर्थिक संकटात...
वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाने येरोळ येथील शेतकरी सापडले आर्थिक संकटात…
शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांचे कळप सोयाबीन, मूग, तूर पीक फस्त करत आहेत, मागील काही दिवसापूर्वी वन विभागा मार्फत वन्य प्राण्यांची धुडगूस कमी करण्यासाठी तसेच कायम स्वरुपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येरोळ मोड उदगीर-लातूर राज्य महामार्गावर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन ही केले होते, तसेच शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी १०० % अनुदानावर तार कुंपण मिळावे व वन विभागा तर्फे वन्य प्राण्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन ही करण्यात आले होते, परंतू वन विभागाने अजून पर्यंत कोणत्याच उपाय योजना राबविण्यासाठी पाऊल उचलायला तयार नाही. वन विभाग शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होताना नुसते पाहत आहे, शासन दरबारी शेतकऱ्यांची दाद घेतलीच जात नाही, हे शेतकरी काही दिवसापासून अनुभवत आहेत शासकीय अधिकारी आणि सरकार फक्त शेतकऱ्यांची वेळ काढू योजना राबवत आहे, वन विभागाच्या नियमावलीत येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या धुमाकुळीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद इ. पिके आहेत, पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना शासकीय अधिकारी त्यांच्या पगारातील रक्कम देतील का? अशी चर्चा शेतकरी करत असताना दिसत आहेत,शेतकऱ्यांनी वारंवार शासन दरबारी प्रश्न मांडून सुध्दा शासना तर्फे वन्य प्राण्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्यात येत नाही जर शासन शेतकऱ्यांचा अश्या प्रकारे उपहास करत असेल तर शेतकऱ्यांना सतत पिकाच्या नुकसानी मुळे हाताशी आलेले पीक शासनाच्या वेळ काढू वृतीमुळे शेतकऱ्याच्या समोर आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असे पिकाचे नुकसान झालेले शेतकरी धनराज चावरे,दिलीप वाघमारे, बालाजी जळकोटे,गोविंद बालवाड, कृष्णा बालवाड, शंकर वाघमारे, त्र्यंबक वाघमारे, शंकर बिरादार,दत्ता बिरादार, ज्ञानोबा बालवाड, मारुती टाकळगावे, यांनी मत व्यक्त केले. तसेच इतर अनेक शेतकऱ्याची पिके वन्य प्राण्यांनी धुडगूस घालून फस्त केले आहेत तरी यावर वन विभागाने गांभीर्याने तात्काळ पाऊल उचलून वन्य प्राण्यांच्या धुडघुसी पासून शेतकऱ्यांच्या पिकाचा बचाव करावा असे शेतकरी व येरोळ परिसरातील गावकरी मंडळी मागणी करताना दिसत होते.वन विभाग आता तरी तात्काळ पाऊल उचलून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करेल या आशेने शेतकरी वाट पाहत आहेत.