येरोळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात संपन्न…
येरोळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात संपन्न...
येरोळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात संपन्न…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे विठ्ठल रुक्मिणी सभगृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन येरोळचे उपसरपंच सतिष शिंदाळकर,भिवाजी लोकरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले तर एल.जी लोंढे यांनी लोकमान्य टिळक यांच्या
प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले तर भाजपचे युवा नेते अमर माडजे, भिम शक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रकाश बनसोडे, ओबीसी महासंघाचे प्रभाकर चोचंडे, जिल्हा परीषद शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश नागटिळक, भागवत तोंडारे, एल.जी लोंढे व नितेश झांबरे या सर्वांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करत अभिवादन केले तर जिल्हा परीषद शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश नागटिळक यांनी ध्वजारोहण केले तसेच सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.यावेळी जिल्हा परीषद शाळेतील इ.४ थी मधील विद्यार्थी विकास लोंढे व इ.६ वी मधील विद्यार्थीनीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी याकरिता थोडक्यात माहिती सांगितली त्याबद्दल त्या चिमुकल्यांना शाब्बासकी देत फुल ना फुलाची पाकळी म्हणत प्रभाकर चोचंडे यांनी विद्यार्थ्याना बक्षिस दिले.
त्यानंतर प्रभाकर चोचंडे यांनी सखोल असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे एवढेच नव्हे तर सर्वांनी दैनंदिन जीवनात अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे असे सांगितले त्या बरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील खडतर प्रवासावर प्रकाश टाकला तर
जिल्हा परीषद शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश नागटिळक यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना युवा पिढीने नुसते मोठ-मोठे आवाज करणारे ध्वनी यंत्र लावून त्या समोर नाचून साजरी न करता त्यांचे साहित्य वाचन करून करण्यात यावे ही काळाची गरज आहे असे सांगितले तसेच पालकांनी व विद्यार्थ्यांनी नुसते आपल्या बाह्य अंगाच्या देखाव्याला महत्व न देता साहित्य वाचनाला सुद्धा वेळ देणे तेवढेच महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल गणेश मित्र मंडळ येरोळ चे अध्यक्ष सुनील लोंढे, उपाध्यक्ष जनार्धन लोंढे व तसेच सदस्य यांनी केले होते तर सूत्रसंचलन ग्रामपंचायत कर्मचारी बाबुराव वाघमारे यांनी केले. यावेळी येरोळ गावचे उपसरपंच सतिष शिंदाळकर, भिवाजी लोकरे, भिम शक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रकाश बनसोडे,भाजपचे युवा नेते अमर माडजे,ओबीसी महासंघाचे प्रभाकर चोचंडे, एल.जी लोंढे, भागवत तोंडारे, निलेश उमामोड, हरीश बनसोडे, संदीप पाटील, नामदेव बनसोडे,विठ्ठल लोंढे, अब्दुल मुजेवार, सुरेश लोंढे,अंकुश लोंढे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बाबुराव वाघमारे, विनोद लोंढे, बालाजी झटे, लक्ष्मण लोंढे व गावकरी मंडळी उपस्थित होते.