जिल्हा परिषद प्रशालेत इ.स १९६२ चे शिक्षक गोविंदराव कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार करत शिक्षक दिन उत्साहात संपन्न…
जिल्हा परिषद प्रशालेत इ.स १९६२ चे शिक्षक गोविंदराव कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार करत शिक्षक दिन उत्साहात संपन्न...
जिल्हा परिषद प्रशालेत इ.स १९६२ चे शिक्षक गोविंदराव कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार करत शिक्षक दिन उत्साहात संपन्न…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी :
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परीषद प्रशाला येरोळ येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आली, या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. एन निचळे हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून इ.स १९६२ सालचे माजी शिक्षक गोविंदराव कुलकर्णी, पुष्पाताई कुलकर्णी,रामचंद्र कुलकर्णी व शुभांगीताई कुलकर्णी हे होते. या कार्यक्रमात शाळेचे माजी सेवा निवृत्त शिक्षक यांचा सहकुटुंब फेटे बांधून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, त्याबरोबरच शाळेचे सर्व शिक्षक वृंद व उपस्थित मान्यवरांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रभाकर आप्पा बरदाळे यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत असताना सांगितले की आम्ही प्रत्यक्षात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पाहिलं नाही परंतू त्यांच्या विचारांचे अनुकरण करून इ.स १९६२ ला जिल्हा परिषद प्रशाला येरोळ येथे रुजु झालेले व आम्हाला विद्यादान करणारे माजी सेवा निवृत्त शिक्षक गोविंदराव कुलकर्णी यांना आम्ही पाहिल आहे व मी आवर्जून म्हणेन की हेच आमचे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ; कारण त्यांनी आपली शिक्षण सेवा निःस्वार्थपणे पार पाडली आहे त्या क्षणाचे आम्ही स्वतः त्यांचे विदयार्थी साक्ष आहोत, त्या सोबत ते आजही आपल्या सेवा निवृत्त वेतनातून शाळेत स्वतःहून मागील तीन वर्षापासून दरवर्षी शाळेस भेट देऊन शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात तसेच एखादा मूर्तिकार दगडावर संस्कार करत सुंदर अश्या रेखीव लेण्या बनवतो त्याच प्रमाणे शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना घडवाव व त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे व आपल्या शाळेचे नाव लौकिक व्हावे अशी प्रेरणा निर्माण करावी असे ते बोलताना म्हणाले, त्यानंतर शिवानंद भुसारे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी समोर व्यासपीठ गाजवावे असे म्हणत सखोल असे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या मौलिक कामगिरीची विद्यार्थ्यांना प्रचिती व्हावी म्हणून व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडावी व त्यांच्या विचारांचे अनुकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात सदैव शैक्षणिक कार्या बरोबरच देशभक्ती, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी थोरांच्या इतिहासाची उजळणी करावी असे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना प्रा.प्रभाकर चोचंडे यांनी विद्यार्थ्याना सांगितले. तसेच काही चिमुकल्यांनी सुंदर अशी भाषणे ही केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्पिता लोकरे व वैष्णवी वाघमारे यांनी केले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरीक वसंत पाटिल, प्रभाकर आप्पा बरदाळे, विजयकुमार माकणे, ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रभाकर चोचंडे, शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी दाडगे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर माडजे, शिवानंद भुसारे तसेच शाळेतील शिक्षक मा.मुख्याध्यापक प्रकाश नागटिळक, हमीद शेख, बिरादार एम.एस, बिरादार टी.डी, सचिन कांबळे, श्रीमती शेटे, श्रीमती आंबुलगे, श्रीमती जावरे, माणिक चौंसष्टे, बालाजी उमामोड, नितेश झांबरे, विद्यार्थी व पालक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.