Uncategorized

शिरूर अनंतपाळ तालुक्याचा कायापालट करणार

शिरूर अनंतपाळ तालुक्याचा कायापालट करणार मतदान रुपी आशिर्वाद द्या आ.संभाजी पाटील यांचे जनतेकडे साकडे...

शिरूर अनंतपाळ तालुक्याचा कायापालट करणार मतदान रुपी आशिर्वाद द्या आ.संभाजी पाटील यांचे जनतेकडे साकडे…

 

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:

नितेश झांबरे

 

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ गावी जन सन्मान पदयात्रेचे हरिनामाच्या गजरात व उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर येरोळ नगरीतील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी या संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोविंद आबा पोतदार हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडत असताना उपसरपंच सतिष शिंदाळकर यांनी येरोळ नगरीत कोण-कोणते कामे प्रगतीपथावर आहेत व कोणते कामे मंजूर करण्यात यावेत याबद्दल थोडक्यात माहिती दिली व सूत्रसंचालन बाबुराव वाघमारे व संतोष शेटे यांनी केले तसेच आभार भाजपचे युवा नेते अमर माडजे यांनी मानले.या जन सन्मान कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास जमिन दान करणाऱ्या बालाजी शिंदाळकर दानशूर व्यक्तीचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, त्याबरोबरच गावच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारे जेष्ठ नागरिक नामदेव शिंदाळकर, भागवत पाटील, प्रा.सूर्यकांत येरोळकर, प्रकाश पांचाळ, प्रल्हाद जंगमे, नंदु पाटिल,कमलाकर पालकर यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका मदतनीस, यांचा सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला.

अक्कलकोट मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी येरोळ येथे जन सन्मान यात्रेस भेट दिली व जनतेशी संवाद साधताना पुन्हा एकदा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदार संघातून निवडणूक लढवून मतदारसंघाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ही व्यक्त केली. या कार्यक्रमात आमदार संभाजी निलंगेकर जनतेशी संवाद साधत असताना म्हणाले येरोळ ग्रामस्थांनी मला इतके दिवस दिलेल्या मतदान रुपी प्रेमाचा आदर करतो व आपण दिलेल्या प्रेमाबद्दल जन्मभर ऋणी राहीन व यावेळी आपण मला आपल्या गावाचा भरभरून विकास करण्याची संधी देत मतदान रुपी आशिर्वाद द्यावा असे आवाहन ही केले. या प्रसंगी अक्कलकोट मतदारसंघाचे आ. सचिन कल्याण शेट्टी, शिरूर अनंतपाळ भाजप चे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, गावचे सरपंच सुकुमारताई लोकरे, युवा उपसरपंच सतिष शिंदाळकर,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर माडजे, मा.भाजप तालुका अध्यक्ष गोविंद पोतदार,महिला जिल्हाध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, मा. पं.समिती सभापती धोंडीराज सांगवे, मा. सभापती गोविंद चिलकुरे, सं.गा.यो. अध्यक्ष अनिल शिंदे, मनरेगा तालुकाध्यक्ष पंडितजी शिंदे, भाजपा कृषी अध्यक्ष नागनाथ चलमले, संजय दोरवे, जुईताई शिराळकर, तुकाराम पाटील,प्रभाकर पालकर, प्रा.सूर्यकांत येरोळकर, भीमराव सुमठाणे, प्रदीप पाटील, ग्राम पंचायत सदस्य अमर पाटील, एल.जी.लोंढे, मच्छिंद्र भालेकर,हबीब पठाण, भागवत तोंडारे, गोविंद बाचवाड, नामदेव शिंदाळकर, विशाल शिंदाळकर, शंकर पालकर, श्यामराव शिंदाळकर, संदीप पाटील, हणमंत पालकर, रत्नाकर शिंदाळकर,आदींसह येरोळ पंचक्रोशीतील नागरिक, माता-भगिनी, पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button