टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप !
महाराष्ट्र मीडिया न्यूज रिपोर्टर ‘ दिपक पवार’
दौंड,ता.१७ : दौंड तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत बाप्पाला विसर्जित केले. नानगाव ता.दौंड येथे गेल्या दहा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. तालुकाभरात विसर्जन शांततेत सुरू असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाल्याने गणेशोत्सव काळात अत्यंत आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशाची लहान मुलांना तर पर्वणीच असते.
यंदाच्या वर्षी नानगाव येथील जयभवानी तरुण मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या तालात पारंपरिक पद्धतीने बाप्पाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातून मिरवणूक झाल्याने भीमा नदीकाठी आरती व त्यानंतर विसर्जन करून प्रसाद वाटप करण्यात आला. यामध्ये नानगाव भजनी मंडळाने सहकार्य केले. यावेळी शरद खळदकर, विष्णू खराडे, हरिभाऊ खळदकर,राजाभाऊ यादव,माणिक खळदकर, नामदेव खळदकर, सोमनाथ कोंडे, जमीर मुजावर, रोहित कांबळे, सागर पडळकर, सुमित गायकवाड, किरण सुपेकर, सुनील जगताप, विठ्ठल गायवाड आदींसह तरुण पिढीने देखील सहभाग यामध्ये सहभाग नोंदवला.