वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धम्मपाल निचळे यांच्या तर्फे शाळेला विविध साहित्य भेट…
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धम्मपाल निचळे यांच्या तर्फे शाळेला विविध साहित्य भेट...
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धम्मपाल निचळे यांच्या तर्फे शाळेला विविध साहित्य भेट…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील जिल्हा परिषद प्रशाला येरोळचे मुख्याध्यापक निचळे धम्मपाल यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळत शाळेला सहा कचरा कुंडी भेट दिल्या, यामुळे मुलांना लहानपणा पासूनच स्वच्छते बाबत सवय लागावी तसेच त्यांनी जीवनात त्याचा अंगीकार करावा असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो तर त्या सोबतच स्वच्छ भारत अभियान घरोघरी पोहचले जावे व आपली शाळा, आपले घर, आपले गावे स्वच्छ आणि सुंदर होण्यास आपोआप या उपक्रमातून मदत होईल.
वाढदिवसाच्या प्रसंगी नेहमी ते शाळेला काही ना काही भेटवस्तू देत असतात. या वाढदिवस प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्याना वही, लेखणी, उजळणी तसेच वर्ग ९ वी आणि १० वी साठी ३० सेंटिमीटरच्या मोज पट्टया असे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील शिक्षक शेख, एम.एस बिरादार , सचिन कांबळे , श्रीमती स्वामी , श्रीमती शेटे , श्रीमती अंबुलगे , शिक्षिका निशा जावरे उपस्थित होत्या. व विदयार्थी उपस्थित होते तर विदयार्थी, पालक व गावकरी मंडळी तर्फे त्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले.