नंगारा भवनाचे 5 ऑक्टोबरला मा.पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होणार
बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - अर्जुन जाधव
नंगारा भवनाचे 5 ऑक्टोबरला पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – अर्जुन जाधव
दि.५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा भवनाचे उद्घाटन होणार आहे. बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजनेचे जिल्हा परिषद समितीचे सदस्य अर्जुन जाधव यांनी केले आहे.
देशभरातील बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन जलसंधारण मंत्री संजय राठोड गोंद्री कुंभाचे जनक आरोग्यदूत रामेश्वर नाईक आमदार निलय नाईक बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज जितेंद्र महाराज सुनील महाराज कबीरदास महाराज सुरेश महाराज गोपाल चैतन्य महाराज श्याम चैतन्य महाराज व धर्म जागरण मंच आणि समाजाच्या विविध संघटनेचे प्रमुख उपस्थिती ५ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या नंगारा भावनाच्या उद्घाटन सोहळ्या देशभरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषा करून वाजत गाजत सहभागी व्हावे अशी आवाहन ही अर्जुन जाधव यांनी केले आहे.
पोहरागड येथील बंजारा समाजाचे गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती त्याच्या प्रयत्नाला यश येऊन आज विरासत ए बंजारा संग्रहालय उभारले जात आहे त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एकूण १३ गॅलरीमध्ये रचला गेलेला बंजारा समाजाचा इतिहास चार मजत्याच्या विरासत ए बंजारा वास्तु संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे या प्रत्येक गॅलरीत विविध प्रकारचे देखावे आणि तेल चित्राच्या साह्याने बंजारा समाजाचा संपूर्ण इतिहास रचला गेला आहे या सोहळ्यास देशभरातील बंजारा बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत वाजत गाजत हजारोच्या संख्येने शामिल व्हावे असे आव्हान अर्जुन जाधव यांनी केले आहे