प्रा. श्याम मानव यांनी हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. श्याम मानव यांनी हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कारंजा: रितेश चौकसे महाराष्ट्र मीडिया कारंजा तालुका प्रतिनिधी.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. श्याम मानव यांनी हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २९ सप्टेंबर रोजी शेतकरी निवास येथे प्रा. मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानादरम्यान त्यांनी चिखावणाऱ्या शब्दात हिंदू धर्मातील देवांची, साधू, संत, महात्मा, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भिडे गुरूजी, प्रदीप मिश्रा अणि सकल मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले. या वक्तव्यामुळे हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होवून वाद उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे.
प्रा. मानव हे नेहमीच हिंदू धर्मातील देवी-देवतांचे अपमान करणारे वक्तव्य करीत असतात त्यामुळे श्याम मानव व व्याख्यानाचे आयोजक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून फ़ौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा सकल हिंदू समाजातर्फ मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येइल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी कारंजा शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.