साकोळ ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश उदगीर-साकोळ-वल्लभनगर गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू
साकोळ ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश उदगीर-साकोळ-वल्लभनगर गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू
साकोळ ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश उदगीर-साकोळ-वल्लभनगर गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील व परिसरातील प्रवाशांच्या सेवेसाठी उदगीर,साकोळ ते वल्लभनगर एसटी महामंडळाची बस प्रवाशांच्या सेवेत असणार असल्याची माहिती उदगीर आगारप्रमुख चिन्मय चिटणीसे यांनी दिली. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतच्या वतीने ता.२१ रोजी उदगीर आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनामध्ये दिवाळीच्या सणासुदीमध्ये व इतर दिवसांमध्ये साकोळ व परिसरातील प्रवाशांना पुणे येथे जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने एकही बस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येऊन या मार्गावरील खाजगी वाहतूकदारांना ज्यादा तिकीट दर देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत होता.जर आपण या मार्गावर आपल्या एसटी मंडळाच्या वतीने एखादी बस चालू केल्यास प्रवाशांना सुखरूप प्रवास होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करण्याची गरज येणार नसल्याचे सांगण्यात आले होते.याच निवेदनाची दखल घेऊन ता.२७ ऑक्टोबर पासून उदगीर बस स्थानकातून उदगीर ते वल्लभनगर सकाळी ९
वा.निघून देवणी,वलांडी,साकोळ येथे सकाळी १०.४५ वा.पोहोचणार
असून पुढे शिरूरअनंतपाळ,
अरीमोड,बोरी,बाभळगाव,लातूर,मुरुड,बार्शी,कुरुडवाडी,टेंभुर्णी, इंदापूर,बिगवन,हडपसर,पुणे,वल्लभनगर येथे रात्री ७ वाजता पोहोचणार आहे.तर परतीच्या प्रवासात सकाळी ९ वाजता वल्लभनगर येथून निघून याच मार्गे साकोळ येथे सायंकाळी ५ वाजता येणार असून उदगीर येथे रात्री ७ वाजता पोहोचणार असल्याची माहिती आगार प्रमुख चिन्मय चिटणीसे यांनी देऊन या चालू झालेल्या गाडीचा प्रवाशांनी लाभ घेऊन एसटीनेच प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले.