येरोळ विद्युत केंद्रातून वारंवार खंडीत वीजपुरवठा विरोधात आंदोलन करण्याचा भीमशक्ती संघटनेचा इशारा…
येरोळ विद्युत केंद्रातून वारंवार खंडीत वीजपुरवठा विरोधात आंदोलन करण्याचा भीमशक्ती संघटनेचा इशारा...
येरोळ विद्युत केंद्रातून वारंवार खंडीत वीजपुरवठा विरोधात आंदोलन करण्याचा भीमशक्ती संघटनेचा इशारा…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे गेल्या अनेक दिवसांपासून येरोळ येथील ३३ के.व्हि. विद्युत केंद्रातून दिवसाआड विद्युत पुरवठा खंडित होत आहे आणि हा वीज पुरवठा फक्त एक दोन तास नव्हे तर तब्बल चार ते सहा तास खंडित होत आहे. येरोळ येथे मोठी बाजारपेठ असुन सध्या सणासुध्दीचे दिवस आहेत. तर येथे दोन बँक महाईसेवा केंद्र असल्यामूळे बहुतांश व्यवहार याच गावातून चालतात. शासकीय कार्यालयांमध्ये जनरेटरची सुविधा असली तरी त्या शासकीय कार्यालयांवरती विविध लोकांचे छोटे मोठे व्यवसाय चालतात.
सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्यांच्या व्यवसायांवरती गदा येऊन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. महावितरणचे कर्मचारी नेहमी येरोळ विद्युतकेंद्राला चाकुरहुन येणारा वीजपुरवठा बंद असल्याचे सांगून विषय टाळून नेतात. परंतु विद्युत कामे करण्यासाठी इतके दिवस लागतात का ? असा प्रश्न आता निर्माण होतो.
विद्युत पुरवठा वेळेवर जरी भेटत नसला तरी बिले मात्र वेळेवर येतात आणि एक दिवस जरी बिल भरण्यास उशीर झाला तरी दंड मागितला जातो. मग एवढं सगळं होऊन सुद्धा लाईट वेळेवर का भेटत नाही असा प्रश्न येरोळ व पंचक्रोशीत असलेलेल्या नऊ गावातील नागरिक विचारत आहेत.
येरोळ येथील ३३ के.व्ही विद्युत केंद्रातुन येरोळसह नऊ गावाला विजपुरवठा केला जातो. परंतु या विद्युत केंद्राकडे कोणाचेही लक्ष नाही. साकोळ येथील कनिष्ठ अभियंत्याला लाईट का गेली असे विचारले असता उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आले. सध्या सणा-सुधीचे तसेच शाळकरी विद्यार्थी यांचे अभ्यासाचे दिवस असुन लाईट नसल्याने व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विदयार्थी यांना संध्याकाळी ञास होत आहे. विद्युत पुरवठा व्यवस्थित करावा अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य मराठवाडा सचिव प्रकाश बनसोडे यांनी सांगितले.