Uncategorized

गृहमतदान सुविधा प्रसारा पुरतीच अंमलबजावणीत मात्र कृतीचा अभाव

सुनील भुतडा
मंगरुळपीर प्रतिनिधी

निवडणूक मतदान टक्केवारी मध्ये वाढ व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने गृहमतदान सुविधा उपलब्ध करून दिली. याबाबत विविध माध्यमातून सूचना प्रसार सुद्धा करण्यात आला आहे. परंतु मंगरुळपीर तालुक्यात संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे दिव्यांग व 85 वर्ष वयातील वृद्ध मतदार मोठ्या प्रमाणात आपल्या अधिकारापासुन वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भान्वये येथील माहेश्र्वरी संघटने चे विदर्भ कार्य समिती सदस्य संजय राठी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे रीतसर लेखी निवेदन वजा तक्रार सादर केली आहे.

त्यानुसार त्यांचे वडील बिंद्राबन कन्हैयालाल राठी यांचे वय 87 वर्ष असून प्रकृती सुद्धा ठीक नसते. करीता यासाठी आवश्यक फॉर्म 12 डी साठी दि 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षमध्ये माहिती घेण्यासाठी भेट दिली. त्या ठिकाणी हजर कर्माचारी कडून योग्य माहिती व फॉर्म मिळू शकला नाही. 1 नोव्हेंबर रोजी हाच प्रकार झाल्याने त्यांनी त्याठिकाणी नमूद भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क करून स्थिती नमूद केली तेव्हा समोरील व्यक्तीने या फ्रॉम नं 12 डी बद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्याचा नमुना उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले ते असे की वरून आमच्याकडे आले नाही ही सबब पुढे करत वेळ मारून नेली. संबंधित यंत्रणेतील या ढिसाळ कारभारामुळे निवडणूक आयोगाला अपेक्षित मतदान वाढ संकल्पनेला एक प्रकारे दुर्लक्षित करण्यात आले आहे. त्या सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असेही सामाजिक कार्यकर्ता संजय राठी व अधिकार वंचित मतदारांनी केली आहे

*संजय राठी यांनी त्यांच्या अनुभव आधारावर आवाहन केले आहे की बी एल ओ. तुमच्याकडे आले तर मागील तारीख टाकून पोच देऊ नये

 

या बाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न आज दिनांक 06 नोव्हेंबर ला केला असता, तहसील कार्यालयातील निवडूणूक बिभागात अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नव्हते. प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील कार्यरत बी एल ओ मार्फत *गृह मतदान लाभार्थी चे पोच पत्र निवडणूक विभागात सादर करने, व त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु हलगर्जी अंगवळणी पडलेल्या कार्यपद्धती नुसार सबंधित 85वय गट तसेच दिव्यांग मतदारपर्यंत ह्या सुविधेची माहितीच पोहचली नाही त्यामुळे असे अंदाजे 17-18 हजार मतदार आपल्या *अधिकारापासून वंचित*राहण्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button