गडचिरोली जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा..
गडचिरोली जिल्ह्याची मागासलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. येथील गडचिरोली ,आरमोरी व अहेरी या तिन विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी बंडखोरी कारण्याचा प्रयत्न केला. पण पक्षाच्या वरिष्ठांनी वेळीच त्याचा बंदोबस्त केला. तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुतीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाचा वरचष्मा दिसुन येत आहे.
गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपाचे उमेदवार वरचढ ठरत असल्याची चर्चा रंगत आहे. आरमोरी क्षेत्रात विद्यमान आमदार कृष्णा गजभे यांना जनतेची साथ मिळत आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाने डॉ. मिलिंद नरोटे हा नवीन चेहरा दिला असल्याने विद्यमान आमदार डॉ देवराव होळी हे दुखावल्या गेले. त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करुन बंडखोरी चा पप्पाझेंडा उभारला. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेळीच समज देऊन उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले.
गडचिरोली विधानसभेत खरी लढत काॅंग्रेस व भाजपात आहे. काॅंग्रेसचे मनोहर पोरेटी हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांचा बराच जनसंपर्क आहे. तर भाजपाचे डॉ. मिलींद नरोटे हे आपल्या क्लिनीक च्या माध्यमातून प्रसिद्ध असुन त्यांचाही बराच जनसंपर्क आहे. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची लढत होणार असा जनतेचा सुर आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्ष जोमात प्रचार – प्रसार करित असल्याने कोण बाजी मारेल याचा अंदाज व्यक्त करणे कठिण आहे.
परंतु भाजपाचे उमेदवार डॉ. मिलींद नरोटे यांची जमेची बाजू म्हणजे माजी खा. अशोक नेते त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. दहा वर्ष त्यांनी खासदार पद भुषविले आहे. मागिल निवडणूकित त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची लोकप्रियता तसुभरही कमी झाली नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा व्यवहार सौजन्य पुर्ण आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड जनतेंनी अनुभवली आहे. जनतेशी नम्रपणे वागणे व अडलेल्यांना आर्थिक मदत करणे या स्वभावामुळे ते आजही तेवढेच लोकप्रिय आहेत.
अशोक नेते खासदार असताना त्यांनी जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी कार्य केले. जिल्ह्यात सुरजागड प्रकल्प, मुख्य मार्ग काॅंक्रेटचे बणले. जिल्ह्यातील जनता ज्या रेल्वेची प्रतिक्षा करीत होती त्या रेल्वे काम वेगाने सुरू आहे. असे अनेक लोकोपयोगी कामे त्यांच्याच प्रयत्नाने पुर्ण होत आहेत. म्हणून आजही ते जनमानसांचे नेते आहेत. आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकत्र मोट बांधून ते महायुतीच्या उमेदवारांकरिता अविरत परिश्रम घेत आहेत.
त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.