Uncategorized

ना मंत्र तंत्र, ना जादू टोना, ना दैवी चमत्कार परंतु सर्वच बिमारीवरती जालीम उपचार केवळ जाडी बुट्टी. विनामुल्य,गरिब रुग्णांना जिवनदान देणारे देवॠषी मधुकर सोमा जाळे.

ना मंत्र तंत्र, ना जादू टोना, ना दैवी चमत्कार परंतु सर्वच बिमारीवरती जालीम उपचार केवळ जाडी बुट्टी. विनामुल्य,गरिब रुग्णांना जिवनदान देणारे देवॠषी मधुकर सोमा जाळे.

ना मंत्र तंत्र, ना जादू टोना, ना दैवी चमत्कार परंतु सर्वच बिमारीवरती जालीम उपचार केवळ जाडी बुट्टी. विनामुल्य,गरिब रुग्णांना जिवनदान देणारे देवॠषी मधुकर सोमा जाळे.

राजन बोरकर, गडचिरोली प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात तोडे ( मसाद ) नावाचे गांव आहे. त्या गावातील मधुकर सोमा जाळे या नावाचे देवॠषी आहेत. जंगलातील वनस्पतीवर प्रयोग करुन त्यांनी हा औषधौपचार सुरू केला. पहिल्यांदा घरच्या मुलिवर प्रयोग करुन त्यांनी इतरांना औषधी देणे सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की, कॅन्सर सारखे रुग्ण दुरुस्त व्हायला लागले.थोडासा प्रचार – प्रसार झाला. आणि लोकांची गर्दी वाढायला लागली. जत्रा भरल्या प्रमाणे गर्दी असते. दोन – दोन दिवस रुग्णाचा नंबर लागत नसल्याने लोक फोर विलर गाड्या घेऊन मुक्कामाने येतात आणि औषधी घेऊन निघुन जातात.
तसे पाहता हे गाव डोंगर दऱ्यांनी व्यापलेले. अतिशय दुर्गम भागात दडलेले. गडचिरोली वरुन धानोरा मार्गे जाताना कन्हाळटोला फाट्यावरून उजविकडे एक रस्ता जातो. तिथुन जवळपास १२ कि.मी. अंतर. सर्व परिसर जंगलव्याप्त असल्याने व कच्चा रस्ता असल्याने जाणाऱ्यांना भिती वाटणे स्वाभाविक आहे. गावात पोहोचल्यानंतर दहा बारा घराचे गाव. गावात एकही घर विटा व सिमेंट चे दिसणार नाही. शेजारी उंच डोंगर. तिथेच मधुकर सोमा जाळे जाडी – बुट्टी देत असतात.
आज दि.०२/११/२०२४ ला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता. ते फारसे मोकळे बोलू शकले नाही. सर्व खेळ स्वप्नाचा असुन रुग्ण दुरुस्त होतात,त्याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज आमची दिवाळी आहे. आमच्या साठी हा मोठा सण आहे. दोन दिवस औषध देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांना परत पाठवित असतांनाच एक टाटा सुमो तिथे आली. रुग्ण कॅन्सर ग्रस्त होता. २५० की. मी. वरुन ते लोकं आले होते. आज औषधी मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मात्र रुग्णांकडिल मंडळींनी आपली व्यथा सांगितली. शेवटच्या स्टेजवर कॅन्सर पोहचलेला आहे. सर्व डॉक्टर्संना दाखविले, पाण्यासारखा पैसा खर्च केला. परंतु काहिच फायदा झाला नाही. आता आपणच शेवटचा आधार आहात, अशी विनवणी केली.
त्या देवॠशींनी त्यांची व्यथा ऐकली व क्षणाचाही विलंब न लावता. आपल्या माणसाला कॅन्सर ची औषधी आणण्याची सुचना दिली व आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले. त्याच्या जवळच्या माणसाने लगतचे डोंगर चढणे सुरू केले.
घर लहाणसे असल्याने गावालगत मोकळ्या जागेवर त्यांनी एक झोपडी उभारली. झोपडीवर प्लॅस्टिक अंथरूण आपला औषधोपचार सुरू केला.
खाली चटई अंथरलेली आहे. रुग्णांना समोर बसवून तो नाडी बघतो. व नंतर जाडी – बुट्टी देतो.
हप्त्याचे शनिवार, सोमवार व बुधवार तीन दिवसच औषधी वाटप करतो. बाकी दिवस जंगल व डोंगरावरुन औषधीयुक्त वनस्पती गोळा करतो.मात्र सोमवारी केवळ किडणी स्टोनवर औषधी व स्टोन काढण्याचे काम करतो. शनिवार व बुधवार इतर रोगांवर औषधी देतो. रुग्णांना फायदा होत आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण बरे होत आहेत. त्यामूळे शेजारच्या जिल्ह्यांतील लोकं रुग्णांना घेऊन येतात,गर्दी करतात आणि तो विनामुल्य गरिबांची सेवा करतो.
गावातील काही मित्र मंडळी त्याला सहकार्य करतात.
आणि हा देवॠषी विनामुल्य कोणत्याही आजारावर औषधींचा,जाडी – बुट्टी चा पुरवठा करित असतो. चार माणसे त्याला मदत करतात.
कुठलीही अपेक्षा न बाळगता. स्वधर्माने जेवढे पैसे दिले ते दान स्विकारतात.समोर ठेवले तर. आणि गोरगरिबांना औषधी पुरवतात. विज्ञान युगात, ना मंत्र – तंत्र, ना जादू,ना दैवी चमत्कार केवळ जडी – बुट्टी म्हणजेच आयुर्वेदाच्या भरवस्यावर विविध आजारांवर रुग्णांना नवसंजीवनी देतात.
हे देवॠषी प्रसिद्धी पासुन वंचित आहेत. जिल्ह्यातील खासदार किंवा आमदारांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शासनस्तरावर या गावाकडे जाण्याचा मार्ग सुधारावा, गावात सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यावी. एवढीच छोटिशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. या देवॠषीला प्रणाम..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button