इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्ट चा १७०० किमी पुणे ते अयोध्या सायकल प्रवास पुर्ण
इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्ट चा १७०० किमी पुणे ते अयोध्या सायकल प्रवास पुर्ण

इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्ट चा १७०० किमी पुणे ते अयोध्या सायकल प्रवास पुर्ण
इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्ट चा १७०० किमी पुणे ते अयोध्या सायकल प्रवास पुर्ण
इंडो ऍथलेटिक्स सोसायटी तर्फे दरवर्षी लांब पल्ल्याच्या राईड आयोजित होतात, यंदा सलग पाचवे वर्ष असून यापूर्वी पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते हम्पी, पुणे ते सोमनाथ गुजरात यशस्वी पूर्ण केले आहे, तर यावर्षी पुणे ते आयोध्या असे सतराशे किलोमीटर अंतर २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर आयोजन करण्यात आले होते. सायकल प्रवासाची सुरुवात भक्ती शक्ती गार्डन पुणे येथून करण्यात आली, याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, सनदी लेखपाल कृष्णलाल बंसल, एमएससीबी चे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर, इस्कॉन चे प्रमुख जगदीश गोरंग प्रभू, उद्योजक प्रशांत गोडगे पाटील, लायन्स क्लबचे डॉ. बिरादार, आयएएस चे पदाधिकारी गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ व इतर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुणे ते आयोध्या सायकल मोहिमेला झेंडा दाखवण्यात आला, सुमारे दहा दिवसांचा संपूर्ण सायकल प्रवास असलेली ही मोहीम सतराशे किलोमीटर अंतर पूर्ण केले,
*सायकल प्रवासाचा मार्ग खालील प्रमाणे*.
दिवस 1 – पुणे ते शिर्डी – 180 km
दिवस 2 – शिर्डी ते शिरपूर – 210 km
दिवस 3 – शिरपूर ते महेश्वर – 128 km
दिवस 4 – महेश्वर ते उज्जैन – 145 km
दिवस 5 – उज्जैन ते ब्यावरा – 156 km
दिवस 6 – ब्यावरा ते बदरवस – 150 km
दिवस 7 – बदरवस ते झाशी – 155 km
दिवस 8 – झाशी ते कानपूर – 230 km
दिवस 9 – कानपूर ते लखनऊ – 95 km
दिवस 10 – लखनऊ ते अयोध्या – 135 km
दिवस 11 – अयोध्या ते वाराणसी – 218 km
सदर मोहिमेमध्ये पुणे, शिर्डी, शिरपूर, इंदोर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर, ब्यावरा, शिवपुरी, गुना झाशी लखनऊ अयोध्या इत्यादी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकानी भेट देण्यात येणार आहे. असे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले, यावर्षी अयोध्या राईड साठी नियोजन समितीने सहमती दिली आणि तीन महिन्यापूर्वी तयारी सुरू झाली , इंडो अथलेटिक्स सोसायटी ३५,००० सभासद संख्या असलेली ही भारतातील आरोग्य व क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी सर्वात मोठी संस्था आहे, देश प्रदूषण मुक्त, बाईक टू वर्क संकल्पना, पर्यावरण आणि युवा पिढीला आरोग्याबाबत महत्त्व पटवून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. भारत सरकार तर्फे 2016 मध्ये संस्थेला सीएसआर त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाची ८० जी आणि १२ अ प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत. संस्थेचे वर्षभर विविध आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात उपक्रम चालू असतात.
यावेळी पुणे ते आयोध्या राईड अजित पाटील, गणेश भुजबळ, प्रवीण जी जगदाळे, अविनाश चौगुले, अविनाश अनुशे, रवींद्र पाटील, रमेश माने, मारुती विधाते, मदन शिंदे, गिरीराज उमरीकर, नारायण औटी, सोपन औटी, योगेश भावसार, पवन मुंदडा सागर सातपुते, संतोष पाथरूडकर, अभय खटावकर, अभिजीत रोडे , ॲड.पंजाबराव इंगळे, डॉ. मानसिंग वाळूंज, अजित माने, अक्षय चांदवडकर, अमित नखाते, दादासाहेब नखाते, सुनील चाको, बाळासाहेब तांबे, अमित शिंदे, अण्णासाहेब काबुगडे, अनंत पाटील, ईश्वर जामगावकर, अनुप कोल्हे, आशिष सोलावो, मुकुंद पाटे, बालाजी जगताप, भालचंद्र रानवडे, योगेश कौशिक, दत्ता मेंदूगडे, इतिहासतज्ञ भूपेंद्र डेरवणकर, चिंतन देसाई, दत्तात्रेय आनंदकर, दीपक गुरुकुल, दीपक उमरानकर, देवेंद्र मोरे, धनाजी गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर कानडे, प्रा.मंगेश चौधरी, गणेश खाडे, गणेश गोरे, गुरुराज पाटील, केशव ठावकर, महेश मगदूम, मोहन गलांगे, नंदकुमार उत्तेकर, प्रशांत तायडे, विवेक कडू, प्रणव कडू, नंदकुमार नखाते, निशांत वायकर, नितीन पवार अमित पवार अजित गोरे, प्रदीपजी टाके, राहुल जाधव, ओम हिंगणे, सुधीर लीपारे, राजेश मोरे, रामदासजी कदम, रमेश कुबडे, संदीप झगडे, संजय जोशी, संदीप गायकवाड, संजीव गोडबोले, संजय कुचे, शैलेश पाटील, शितल बाबर, श्रीकांत बोरसे, श्रेयस पाटील, श्रीकांत चौधरी, श्रीकांत काटे, श्रीकांत घडीगावकर, तुषार माने, तुषार पातुर्डे, उत्तम पाटील, वैभव तांबे, विजय राजगुडे, विनायक नाईक, विशाल पाटील, विठ्ठल लोंढे, विवेक लांडगे, वाल्मीक आहेरराव इत्यादी जणांनी सहभाग नोंदवला व पुर्ण केली.