ना. संजय राठोड यांचा पोहरादेवी येथे सत्कार करण्यात आले.
ना. संजय राठोड यांचा पोहरादेवी येथे सत्कार करण्यात आले.

ना. संजय राठोड यांचा पोहरादेवी येथे सत्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात ना. संजय राठोड यांचा समावेश झाल्याने १६ डिसेंबर ला ते पोहरादेवी येथे दाखल होत. ते जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, बापू आश्रम, डॉ रामराव महाराज समाधी स्थळ व बाबनलाल महाराज समाधीचे दर्शन घेऊन महंत यांचा सत्कार ना. संजय राठोड यांनी केला. यावेळी समाज बांधवासह त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात ना. संजय राठोड यांची वर्णी लागल्यामुळे ते नागपूर वरून १६ डिसेंबर ला श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल झाले. पोहरादेवी येथे सायंकाळी पाच वाजता दाखल होताच फटाक्याच्या आतिष बाजीत त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते जगदंबादेवी मंदिरात दाखल होताच महाआरती, भोगभंडारा अर्पण करून आरदास महंत कबीरदास महाराज यांनी केली.जगद्गुरु संत सेवालाल महाराज, बापू आश्रमात, डॉ रामराव महाराज समाधी स्थळी दर्शन घेऊन भोगभंडारा अर्पण करून आरदास केली.यावेळी धर्मगुरू आमदार बाबुसिंग महाराज यांचा जगदंबादेवी मंदिरात ना संजय राठोड यांनी सत्कार केला.डॉ रामराव महाराज समाधी स्थळी शेखर महाराज यांचा तर बाबनलाल महाराज मंदिरात महंत कबीरदास महाराज, सुनील महाराज व जितेंद्र महाराज यांचा सत्कार केला. यावेळी डॉ रामराव महाराज समाधी स्थळी, भाविकांना संजय राठोड, संजय महाराज यांचे हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी माजी जी प अध्यक्ष दिलीप जाधव,प्रा. डॉ जगदीश राठोड,दिग्रस प स माजी सभापती दिवाकर राठोड,धूपचंद राठोड,माजी जी प सदस्य बाबुसिंग जाधव, प्रा. किशोर चव्हाण, प्रकाश राठोड, विजय पवार,गव्हा सरपंच राहुल भगत, दिनेश मोरे,अमोल राठोड, ललित राठोड
# उमरीगड येथे जेतालाल महाराज, सामकीमाता मंदिर, जगदंबादेवी व प्रल्हाद महाराज यांच्या समाधीचे संजय राठोड यांनी दर्शन घेतले यावेळी संस्थान तर्फे संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला. संजय राठोड यांनी यशवंत महाराज यांचा सत्कार संजय राठोड यानी केला.
# भक्तीधाम येथे भेट देवून संजय राठोड यांनी देवी देताचे दर्शन घेतले. यावेळी येथे छोटे खानी कार्यक्रम पार पडला यावेळी बाहेरून आलेल्या मान्यवरा कडून ना. संजय राठोड यांनी सत्कार स्वीकारला परिसरातील व यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांनी संजय राठोड यांचा सत्कार केला. यावेळी वाशीम, मंगरुळपीर, कारंजा व यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते.