राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी श्याम राठोड यांची फेरनिवड
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी श्याम राठोड यांची फेरनिवड

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी श्याम राठोड यांची फेरनिवड
राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या गोर बंजारा धर्मपीठ, पोहरादेवी येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी धर्मगुरू जितेंद्र महाराज व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता मधुकर जाठोद, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुहास पवार, प्रदेश उपाध्यक्ष प्रेम किसन राठोड, प्रदेश सचिव उमेशभाऊ राठोड, तसेच एस.पी चव्हाण, व प्रदेश उपाध्यक्ष श्रावण भाऊ पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी भिकनभाऊ जाधव यांची एक मताने निवड करण्यात आली. अनेक जिल्हाध्यक्ष व मान्यवरांची निवड करण्यात आली श्यामभाऊ राठोड यांची पुनश्च महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सभेमध्ये बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते वरील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महंत जितेंद्र महाराज यांनी आशीर्वाद पर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा विलासभाऊ राठोड यांनी केले तर संचलन शाम राठोड यांनी केले अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.