Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान

सरपंच सचिव व बीडीओ यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

सरपंच सचिव व बीडीओ यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

पिंपरी अवघड ग्रामपंचायत मधील अपहार प्रकरण

सरपंच सचिव व बीडीओ यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरी अवगण येथे ग्रामपंचायत मधील 21 लाख 41 हजार 874 रुपयाच्या अपहार प्रकरण समोर आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे याप्रकरणी सरपंच सचिव तसेच गटविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मंगरूळपीर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी

केशव साखरे यांनी जऊळका पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायत पिंप्री अवगण येथील अपहार प्रकरण लोकआयुक्त मुंबई यांचेकडे दाखल होते. तेथे दिलेल्या निर्णयान्वये दोषी असलेल्या तत्कालीन सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हा नोंदविणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगरूळपीरच्या विद्यमान सहायक गटविकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले. मार्च २०१६ ते २०२१ च्या चौकशी अहवाल नुसार शासनाची

फसवणूक करुन अपहार केला असल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार केशव साखरे यांनी जऊळका पोलिसांत दिली. यावरुन तत्कालीन सरपंच बेबीबाई अवगण, पार्वताबाई अवगण, तत्कालीन गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार व सुरेश कांबळे, ग्रामसेवक सुरेश पांडे, ज्ञानदेव कदम, मनीष उगले, संजय पाचरणे यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३४, ४०९, ४०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button