येरोळ येथे शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न..
येरोळ येथे शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न..

येरोळ येथे शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि :
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील महेबुब सुभानी दर्गा येथे दि.३० नोव्हेंबर रोजी शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी टिपू सुलतान यांचे स्वातंत्र्य युद्धातील योगदानाची माहिती थोडक्यात बसवेश्वर शिंदाळकर यांनी सांगितले. त्या नंतर प्रा. प्रभाकर चोचंडे हे जनतेशी संवाद साधत असताना म्हणाले की महात्म्याच्या जयंती नुसत्या साऊंड सिस्टीमच्या तालात नाचून न करता महात्म्याच्या जयंती त्यांचे विचार वाचून केल्या पाहिजेत त्या सोबत महात्म्यांना जातीत वाटून न घेता त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे असे बोलताना म्हणाले. या रक्तदान शिबिरात युवा वर्ग सहभाग घेताना दिसून येत होता.लातूर ब्लड सेंटर अँड कंपोनन्ट, लातूर ची सर्व टीम तसेच जयंती समितीचे पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या रक्तदान शिबिरास ३१ जणांनी रक्तदान करुन मोलाचे योगदान दिले. यावेळी या कार्यक्रमास येरोळ गावचे उपसरपंच सतीश शिंदाळकर, प्रा.प्रभाकर चोचंडे,प्रकाश बनसोडे, बस्वराज शिंदाळकर, अब्दुल मुजेवार, बाबुराव वाघमारे,फत्तू बागवान, सिंकदर पठाण, सोहेल कोतवाल, शफीक मुजेवार,विजयकुमार बनसोडे,संभाजी कांबळे, नितेश झांबरे, हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजर पठाण, उपाध्यक्ष अल्ताफ पठाण व सदस्य तसेच गांवकरी मंडळी उपस्तिथ होते.