Uncategorizedअपरिचित इतिहासमहाराष्ट्र ग्रामीण

अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटी कडून पुणे ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड चारशे जणांच्या सहभागासह यशस्वी संपन्न

 

अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटी कडून पुणे ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड चारशे जणांच्या सहभागासह यशस्वी संपन्न

भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटीतर्फे 175 किलोमीटर निगडी गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड आयोजित करण्यात आली, सदर राईड मुकाई चौक रावेत या ठिकाणाहून सुरु झाली, दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता आयटीडीयरचे प्राचार्य श्री संजय ससाने सर ,महावितरण चे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईड सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे पदाधिकारी गणेश भुजबळ, अजित पाटील, गजानन खैरे, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राईड मध्ये 400 जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये 20 ते 25 महिलांचा देखील सहभाग होता सदर राईड मध्ये सर्व सायकल स्वरानी रात्री पुणे ते मुंबई असा प्रवास सायकलवर केला. प्रवासादरम्यान रावेत – तळेगाव- वडगाव- कानेफाटा- कामशेत -लोणावळा — पनवेल- नवी मुंबई या मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे राईड समाप्त झाली. सर्व महिलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे सर्वात लहान वयाने असलेला स्मरद चोपडे या अकरा वर्षाच्या मुलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला तर काही जण 70 वर्ष पूर्ण असलेली देखील या राईट मध्ये होती. आयोजकांमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आणि राष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त ठेवलेल्या या राईटची सांगता करण्यात आली.

 

नियोजनामध्ये रमेश माने, वसंत बारींगे, अमित पवार, अपर्णा कुलकर्णी आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button