
शासकीय रेखाकला परीक्षेत श्री गोविंद विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई द्वारा 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये श्री गोविंद विद्यालय पार्डी ताड ने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
यामध्ये एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत कु. गायत्री ज्ञानेश्वर लांभाडे, कु. शितल पुंजाजी लांभाडे यांना ए ग्रेड तर अभिषेक दीपक मुखमाले, आकाश रामदास मूखमाले, कु. अक्षरा विष्णू पानभरे, कु. गौरी शामराव कुरवाडे यांना बी ग्रेड प्राप्त झाला. तसेच इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत कु. अंजली गोपाल तायडे कु. ज्ञानेश्वरी गोपाल सावके, कु. हर्षदा अनिल सावके, कु. प्रणाली प्रफुल येलकर, कु. सानिका दत्ता पानभरे, कु. श्रद्धा विजय लांभाडे, यांना ए ग्रेड तर, प्रतीक भारत भगत यांना बी ग्रेड प्राप्त झाला.
शाळेच्या स्नेहसंमेलना मध्ये संस्थेचे सचिव शरदराव ठाकरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जिवन हगवणे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, संस्थेचे सचिव शरदराव ठाकरे, मुख्याध्यापक शामराव ठाकरे, कलाशिक्षक गोपाल गावंडे, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांना दिले.