गुटखा माफि्यांना रंगेहात पकडले : मांडवी पोलिसांची मोठी कामगिरी
राज्यात गूटखाबंदी असल्याने गूटखा माफियांनी बाहेरच्या राज्यात आपली सेटींग लावून गूटख्यांची तस्करी करत असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे.

राज्यात गूटखाबंदी असल्याने गूटखा माफियांनी बाहेरच्या राज्यात आपली सेटींग लावून गूटख्यांची तस्करी करत असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे.
नेहमीप्रमाणे तेलंगणातून मराठवाड्यात गुटख्याची तस्करी करणारी कार येत असल्याची माहिती मांडवी पोलीसांना मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख. यांच्या आदेशाने पिंपळगाव फाटा येथे पोलीस हेडकॉन्सेटेबल.प्रकाश अस्वले, पोलीस कॉन्स्टेबल. श्याम चव्हाण, मनिष ठाकरे, अर्जुन पवार यांनी नाकाबंदी केली. त्यांना पहाटे ४ वाजता आदिलाबादकडून भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर येत असल्याचे दिसून आले.
यावेळी सदर वाहनास थांबविण्यासाठी बॅरीकेट्स लावले असता सदर गाडी फिरून आदिलाबादकडे परत निघाली. तेव्हा संशय आल्याने. त्या गाडीचा पाठलाग करत तेलंगणाच्या लक्ष्मीपूर चेक नाका येथे थांबवून गाडी क्र. एम. एच.१२- के. एम. ३८१७ या गाडीला ताब्यात घेतले.
गाडीतील चालक अजगर अहमद फकीर मोहमद सोबत शरीक नूर मोहंमद दोघे राहणार
सोनपीर दर्गा माहूर यांना ताब्यात घेऊन वाहनाची पाहणी केली असता गाडीत गुटखा असल्याचे आढळले. गुटखा कोणाचा आहे? असे विचारले असता बाबर अहमद फकीर मोहमद राहणार माहूर यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर गाडीतील मुद्देमाल चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे आणला असता मुद्देमालची पाहणी करत असताना दोघे आरोपी लघुशंकेला जातो म्हणून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यामध्ये पोलिसांनी विविध कंपन्यांचा ७० हजार १०४ रुपये किमतीचा गुटखा व वाहन असा एकुण ३ लाख १०४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून फरार आरोपीचे शोध घेणे सुरू आहे.
प्रतिनिधी भारत राठोड. महाराष्ट्र मिडीया टि.व्ही. किनवट – माहूर