Uncategorizedअपरिचित इतिहासमहाराष्ट्र ग्रामीण

मांडवी येथे गोरशिकवाडीचे जनक काशीनाथ नायक जयंती साजरी

मांडवी येथे गोरशिकवाडीचे जनक काशीनाथ नायक जयंती साजरी

मांडवी येथे गोरशिकवाडीचे जनक काशीनाथ नायक जयंती साजरी .

 

१३ जानेवारी हा तमाम गोरमाटी गणाला जागा करणाऱ्या एक सच्चा नायक काशिनाथ नायक यांचा जन्मदिवस आहे. गोरसिकवाडी, गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हा दिवस चेतना दिवस म्हणून साजरा करण्यात येते.

गोर बंजारा समाजात अनेक महापुरुष जन्माला येऊन गेले. त्यांनी आपापल्या कालखंडामध्ये चांगलेच संघर्ष करून त्यांनी समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण एकविसाव्या शतकातही काशिनाथ नावाचा एक ध्येयवेडा माणूस गोर बंजारा समाजाला एकसंघ करण्यासाठी पेटून उठला आणि गोरसिकवाडीच्या माध्यमातून भारत भ्रमण करून त्यांनी गोरमाटी गणाला लढण्याचे बळ दिले. त्यामुळे गोरसिकवाडीचे मुखीया म्हणून काशिनाथ नायक यांचे नाव आज महाराष्ट्रातच नाही तर देशात मानाचे मानले जाते.

काशिनाथ नायक यांनी आपल्या घरादाराचे सुखसोयीला बगल देऊन संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतातील बंजारा बहुल भागातील तमाम गोरमाटी गणाला जागवण्याचे काम त्यांनी अहोरात्र केलेले आहे. गोरसिकवाडी संघटनेची स्थापना करून त्यांनी गोरमाटीच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवतरुणांना प्रवृत्त करण्याचे काम त्यांनी केले.

काशिनाथ नायक हे एका एसटी महामंडळात एसटी मेकॅनिक या पदावर कार्यरत होते. काशिनाथ नायक यांनी आपली ड्युटी सांभाळून समाजासाठी सुटटीचा दिवस घरच्या परिवारात न गुंतवता समाजासाठी भ्रमण करायचे.

काशिनाथ नायक यांनी आपल्या चळवळीत काम करण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ११ – १२ पूर्णवेळ कार्यकर्ता तयार केले. जे की आज अविवाहित राहून अजिवन चळवळीसाठी काम करण्याचे शपथ घेऊन पूर्ण भारतात कुठेना कुठे समाजांना जागृत करण्याचे काम करत आहे.

त्यांचेच फळ म्हणून गोर शिकवाडी गोरसेना हे आजही आक्रमक भूमिका घेऊन काम करत असताना दिसून येत आहे. काम करत असताना काशिनाथ नायक आपल्या तब्बेती कडेही फार लक्ष दिले नसल्याने

९ एप्रिल २०२१ साली काशीनाथ नायक यांना कोराणाच्याकाळाने घेरले आणि नायक यांची प्राणज्योत मावळली. काशीनाथ नायक हे बस महामंडळात मॅकॅनिक या पदावर कार्यरत होते. आपली ड्यूटी करून सूट्टीच्या दिवशी आपल्या परिवारात न गुंतवता भूमण करत नायक समाज प्रबोधनाचे काम करत असे.

या महामानव क्रांतीसूर्य काशीनाथ नायक यांची जयंती मांडवीतही साजरी करण्यात आली आहे . यावेळी गोर सेनेच शाखा प्रमूख अनिल पवार, संतोष श्रीमनवार, शिवकुमार ठाकूर, बम्पलवार सर, रविन्द्र जंगलेवाड, विजय मगरे, दरसांगवीचे उत्तम नायक, संतोष नाईक, अशिष राठोड, पिन्टू चव्हाण, राजूभाऊ राठोड, सुरेश चव्हाण, बादल राठोड, अमन पवार, हिरापूरचे गोर सेनेचे अजय जाधव, पारस जाधव, पप्पू जाधव, डॉ. आर.व्ही. राठोड, भारत राठोड, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र मिडीया प्रतिनिधी भारत राठोड किनवट – माहूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button