पोटी जिल्हा परिषद शाळेत कलाविष्कार 2025 कार्यक्रम संपन्न
पोटी जिल्हा परिषद शाळेत कलाविष्कार 2025 कार्यक्रम संपन्न

मंगरूळपीर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा पोटी येथे नुकताच कलाविष्कार 2025 स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सादर केलेली नृत्ये व विनोदी नाटिका पाहून पालक व गावकऱ्यांनी चक्क बक्षिसांचा पाऊसच पाडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी उद्घाटीका म्हणून मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती निर्मला गोंदेवार ह्या होत्या. तर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच योगेश सातपुते, माजी केंद्रप्रमुख अशोक ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य सतिष दोड, ओंकार गावंडे, विनोद मनवर, अनंता गावंडे, मोहन सुडके, रेश्माताई भगत, प्रवीण बडवे, विनोद इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,व ग्राम पंचायत पोटी चे सर्व सदस्य उपस्थित होते. कलाविष्कार 2025 कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्ये, स्फूर्तिगीते, बालगीते, देशभक्ती पर समूहनृत्ये, पोलीस सन्मान गीत, समाजप्रबोधन नाटिका इत्यादी विविधांगी कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल तीन तास चाललेल्या या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचा पोटी व परिसरातील नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला. हास्यकल्लोळ व विविध गीतांच्या नृत्याबरोबरच सदुची सोयरीक ही सामाजिक प्रबोधनपर तुफान विनोदी नाटिका सादर करून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सादर केलेल्या है प्रीत जहाँ की रीत सदा या नृत्याने तर गावकऱ्यांची मने जिंकली. प्रेक्षकांसाठी मनोरंजन व समाजप्रबोधन ही दोन्ही उद्दीष्टे साध्य झाली. पोटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या या कलाविष्कार कार्यक्रमाची गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात म्हणूनच हा कार्यक्रम पाहून बक्षीसांचा चक्क पाऊसच पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाहीत असे मत शाळेचे मुख्याध्यापक शरद सुरसे यांनी यावेळी व्यक्त केले. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या प्रमुख कु भारती गावंडे, उच्च प्राथमिक विभाग प्रमुख दत्तात्रय दिघडे, खेळ व क्रीडा विभाग प्रमुख आशिष डोंगरे यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले. सदर कार्यक्रमासाठी वेशभूषा व सजावट जबाबदारी शाळेतील शिक्षिका कु. राजश्री श्रीखंडे व प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु पुजा सुडके यांनी पार पाडली. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने गटशिक्षणाधिकारी श्रीमती निर्मला गोंदेवार, केंद्रप्रमुख अशोक ठाकरे व राजेंद्र ठोकळ यांचा सेवानिवृत्ती बाबत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायत पोटी चे सर्व पदाधिकारी, पालक मंडळी, राजू भाऊ दोड,दर्शन सूर्यवंशी, गावातील युवक मंडळ, महिला बचत गट, समता सैनिक दल, अंगणवाडी कर्मचारी शाळेचे सर्व आजीमाजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.