प्रेरणा समाजसेवी फाउंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांसाठी विविध उपक्रमाने अभिवादन…
प्रेरणा समाजसेवी फाउंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांसाठी विविध उपक्रमाने अभिवादन...

प्रेरणा समाजसेवी फाउंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांसाठी विविध उपक्रमाने अभिवादन…
तालुका प्रतिनिधी मंगरुळ पीर
***मंगरूळपीर शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी विविध खेळ उपक्रम करून सावित्रींना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी तळ्यात मळ्यात एका मिनिटात फुगे फोडणे लगोरी एका मिनिटात वक्तृत्व कला एका मिनिटात उखाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्थित सर्व महिलांना गिफ्ट कुपन देऊन त्यांना लवकरच एक भेट देण्याचा मानस प्रेरणा समाजसेवी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात ज्ञानज्योती सावित्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अन्य महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा फाउंडेशनच्या प्रेरणा इंगोले यांनी केले महिलांसाठी विविध उपक्रम भविष्यातही करण्याचा मानस बोलून दाखविला पत्रकार अशोकराव त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना सदर फुले उद्यानात सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा होतात व त्याप्रसंगी वृक्षारोपण केले जाते वृक्ष लावणे व जगणे ही काळाची गरज असून आपणही एक हक्काचं झाड लावावं आणि त्याला जगवावं कारण पर्यावरण बदलते पर्यावरणात बदल होतोय आज जर आपण झाडे लावली नाहीत तर आपलं उद्याचं भविष्य अंधा करणे असणार म्हणून एक तरी आपल्या हक्काचं झाड लावण्याचे आवाहन करत या उद्यानात गेल्या तीन वर्षापासून निशुल्क योग शिबिर चालू आहे या शिबिराचा सर्व महिलांनी व पुरुषांनी आपल्या निरोगी जीवनासाठी लाभ घेण्याचे आवाहन करत प्रेरणा फाउंडेशनच्या उपक्रमाची ही कौतुक केले कार्यक्रमासाठी जवळपास 500 च्या वर महिलांची उपस्थिती होती अनेक महिलांनी उपक्रमाचे कौतुक केले यावेळी पत्रकार बांधवांचा मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा फाउंडेशनचे आशिष इंगोले प्रदीप बुधे रोशन इंगोले मयूर फुके गौरव इंगळे हितेश बुधे संजय दुर्गे राजु मोरे प्रेरणा इंगोले पुष्पा खंडारे निकिता अंबडकर उन्नती भगत काजल मनवर,अशोक राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन आशिष इंगोले यांनी केले तसेच सकाळी सहा वाजता फुले उद्यानातच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था महात्मा फुले पतंजली योग समितीच्या वतीनेही योगसाधकांच्या वतीने आई सावित्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील सोनखास मध्ये अंबादास राऊत यांच्या घरासमोरील आई सावित्रीच्या स्मारकाजवळ सुद्धा परिसरातील सर्व भगिनींनी आई सावित्रीच्या स्मारकाची पूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले