रिसोड शहरात २५० किलो प्लास्टिक जप्त; १२ व्यापारांवर कारवाई, ९५०० /- दंड वसूल, नगरपरिषदेची कारवाई
रिसोड शहरात २५० किलो प्लास्टिक जप्त; १२ व्यापारांवर कारवाई, ९५०० /- दंड वसूल, नगरपरिषदेची कारवाई

रिसोड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्री. सतीश शेवदा यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहीमेत २५० किलो प्लास्टिक बॅग जप्त करण्यात आले असून १२ व्यापाऱ्यांकडून ९ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.
रिसोड शहरांमध्ये व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक बॅगचा सर्रासपणे वापर करण्यात येत होता. प्लास्टिक बॅगचे विघटन होत नसल्याने
प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांवर निर्बंध यावा यासाठी मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक बंदी बाबत फलक व जाहीर दवंडी देऊन महिनाभरापासून जनजागृती केली. प्लास्टिक बंदी पथक तयार करण्यात आले. प्लास्टिक बंदी पथकाकडून नियमित कारवाई करण्यात येणार असुन प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांनी आपल्या दुकानात शासनाच्या आदेशानुसार कॅरीबॅग बंदी असल्यामुळे कोणीही कॅरीबॅग मागू नये’ असे फलक लावावे. प्लास्टिक बंदी पथकाने कारवाई
केली असता २५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व १२ व्यापाऱ्यांकडून ९ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.
मोहिमेचे पथक प्रमुख म्हणून पाणीपुरवठा अभियंता नंदकिशोर डाखुरे – यांच्या सोबत प्रफुल्ल काळे, सुनील मगर, धोंडीबा डुकरे, रोहित बठेल, प्रतापराव देशमुख, मुजम्मिल मनियार, राजेंद्र पटटेबहादुर,अक्षय मंत्री, मनोज पंडीत, राजु नकवाल, रोहित नकवाल, चेतन नकवाल, तुषार इंगळे , गणेश गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. शहरातील सर्व दुकानदार, पथविक्रेते व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू वापरू नये. आढळून आल्यास नगर परिषदेद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल असा इशारा नगर परिषदेने दिला.