शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘उद्योजकता प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'उद्योजकता प्रेरणा दिवस' उत्साहात साजरा

मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी | (दि.१५): मंगरुळपीर येथे दि.१२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिना निमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.एस.व्हि. नखाते, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगरुळपीर, प्रमुख उपस्थिती श्री.ढोबळे साहेब, नायब तहसीलदार मंगरुळपीर हे होते. प्रमुख मार्गदर्शक श्री.मनोहर बनसोड सर, माजी प्राध्यापक हे उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रमाता जिजाऊ यांनी कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले यावर भर घातली. अध्यक्षीय भाषणात श्री.एस.व्हि.नखाते, प्राचार्य साहेबांनी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले आणि तसेच तारूण्य व उद्योजकता यावर सुध्दा मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.आर.पी सोनोने, शिल्पनिदेशक पत्रकारागिर यांनी व प्रशिक्षणार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. आर.पी सोनोने शिल्पनिदेशक पत्रकारागिर, कु एस.ए. तायडे, मुख्य लिपीक, श्री एस.एस. राऊत शि.नि.संधाता, श्री.पी व्हि. गिरी शि.नि.फिटर तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. जि.एम.पुरी आणि कु.भाग्यश्री लुंगे, विजतंत्री प्रशिक्षणार्थी यांनी केले.