मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला.
या करारांतर्गत पुढील बाबींचा समावेश आहे :
राज्यातील मागील 20-25 वर्षात विविध विभागांमार्फत, विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामांच्या संरचनांचे मॅपिंग व पडताळणी करणे
सॅटेलाईट डेटा व विविध योजनांखालील उपलब्ध डेटाच्या आधारे संरचनांची भौगोलिक स्थाने नकाशावर चिन्हांकित करण्यासाठी वेब पोर्टल व मोबाइल ॲप तयार करणे
शिवार फेरीच्या आधारे या सर्व संरचनांची सद्यस्थिती समजून घेऊन त्याची नोंद ॲपद्वारे घेऊन भविष्यात जलयुक्त शिवार 3.0 साठी देखभाल, दुरुस्ती आदी कामांचा नियोजन आराखडा बनविणे
भविष्यात होणारी नवीन कामे तसेच देखभाल, दुरुस्तीची कामे याची नोंद ठेवणे
यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे पदाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.