संत बिरबलनाथ महाराज यांचा भव्य यात्रा महोत्सव : मंगरूळपीर
संत बिरबलनाथ महाराज यांचा भव्य यात्रा महोत्सव : मंगरूळपीर
संत बिरबलनाथ महाराज यांचा भव्य यात्रा महोत्सव
मंगरूळपीर:–
येथील योग तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांची यात्रा दि. 15-02-2025 ते 25-02-2025 पर्यन्त भरणार आहे. श्री बिरबलनाथ महाराजांनी 2-3 महिने अगोदर जाहीर करून तत्कालीन जिल्हाधिकारी आर. एन. बॅनर्जी तथा शासकीय अधिकारी वर्ग व हजारो जनसमुदाया समोर नियोजित तारीख व वेळ
पोर्णिमा दिनांक 04-02-1928 शनिवार संध्या. 6-00 वाजता योग विद्याच्या बळावर संजीवन जिवत समाधी घेतली. त्या समाधी दिवसा निमीत्त पोर्णिमा दि. 12-02-2025 बुधवार ला अभिषेक होम व पुजेचा कार्यक्रम होणार असून 11 वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे संगितमय वाचन ह.भ.प. उत्त्मराव पाटील गावंडे रा. वरूड यांच्या मधूर वाणीतून होणार आहे. दिनांक 15/02/2025 शनिवारला सकाळी 9–00 वा. “श्री” ची महापूजा व अभिषेक वेद – शास्त्र संपन्न ब्राम्हणांच्या हस्ते होणार
असून दुपारी 3-00 ते 6 वा. दरम्यान हनुमंत महिला भजनी मंडळ मंगलधाम यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 16-02-2025 ला रात्री o7 ते 8-30 वाजता जय हनुमान सांप्रदायीक भजनी मंडळ यांचा हरीपाठाचा कार्यक्रम होणार असून दि. 17-2-2025 सोमवार रोजी सकाळी 12 ते सायं. 5–00 वाजे पर्यन्त मंदीरातून महिला व पुरूष अश्या दोन लाईनबारी मधून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार असून
जय हनुमान मंडळ वरूड बु. महाप्रसादाची वितरण व्यवस्था पाहणार आहेत. भाविकांनी दरवर्षी प्रमाणे शांततेत प्रसाद घ्यावा, अशी विनंती संस्थानकडून करण्यांत आली आहे. रात्री 08 ते 10-00 ह.भ.प. विशाल महाराज
आळंदीकर यांचा विनोदाने भरपूर किर्तनाचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे. दि. 18-2-2025 रोज गुरुवार
रोजी सकाळी 9–00 वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे पालखीची गावामध्ये मिरवणूक निघणार असून दु. 12–00 ते 1–30 वाजता मंदीरात श्री दहीहंडी व गोपाळकाला ह.भ.प. पांडूरंग महाराज गावंडे रा. शेलोडी
यांचे मधुरवाणीतून तर श्री संत योगीनाथ महाराज यांचे शुभहस्ते होणार आहे. दि. 22-2-202
23-2-2025 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनाची भव्य खंजेरी भव्य स्पर्धेचे आयोजन आयोजक संत श्री अच्युत महाराज भजन स्पर्धा समीती, मंगरूळनाथ, आमदार श्यामभाऊ रामचरणजी खोडे बाळासाहेब पाटील सचिव कृषी उत्पन्न बाजार समीती मंगरूळपीर, विरेंद्रसिंह ठाकूर सर व इतर सदस्य यांचे वतीने तसेच भजन स्पर्धेचे उद्घाटन मा. राज्यमंत्री
सुभाषराव ठाकरे यांचे शुभहस्ते बिरबलनाथ महाराज यांचे मंदीरात करण्यात आले आहे. दि.
24-2-2025 ते 25-2-2025 पर्यन्त दररोज सायंकाळी 04 ते 06 भजन मंडळाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे. पालखी सोहळा मिरवणूकीमध्ये जय मुंगसाजी वारकरी भजनी मंडळ पार्डी ताड, शहनाई वादन मडळ चिंचोली रूद्रायणी, श्रीराम महिला वारकरी भजनी मंडळ शेंदूरजना मोरे, शारदा देवी महिला हरीपाठ मंडळ, मसनी इ. मंडळाचा सहभाग राहणार आहे. तसेच दि. 13-2-2025 गुरूवार ते दि. 17-2-2025 सोमवार पर्यन्त दररोज रात्री 7-00 वाजता हनुमान सांप्रदायीक भजनी मंडळ वरूड बु. यांचा हरीपाठाचा कार्यक्रम राहणार आहे. भाविक भक्तांनी आतापर्यन्त जसे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले तसेच यावर्षी
व यापुढे सुध्दा सहकार्य करण्यांची विनंती संस्थानकडून करण्यांत आली आहे. तसेच भाविक तथा नागरीक व लहान मुलांच्या मनोरजंना करीता यावर्षी भोईराज अमूजमेंट पार्क प्रा. लीमी. यांचे वतीने सोलापुर यात्रेमधून
थेट मंगरूळनाथ यात्रे मध्ये झुले, आकाश पाळणे, ब्रेक डान्स, विविध खानपानाचे स्टॉल, इ. मनोरंजनाचे अॅटम्स संस्थानच्या विनंतीला मान देवुन मंगरूळ वाशियांच्या सेवेत येणार असुन नागरीकांनी शांततेत लाभ घेऊन अॅटम मालक व संस्थानला सहकार्य करण्यांचे आवाहन संस्थानतर्फे करण्यांत आले आहे.