वाशिम जिल्ह्यात ६३ हजार घरकुलांना मंजुरी
वाशिम जिल्ह्यात ६३ हजार घरकुलांना मंजुरी

मंगरुळपीर पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली
महाआवास योजना प्रभावी, पारदर्शक राबविण्याचे सी. ई. ओ. वाघमारे यांचे निर्देश
वाशिम जिल्ह्यात ६३ हजार घरकुलांना मंजुरी
तालुका प्रतिनिधी मंगरुळपीर |गजानन व्यवहारे :
मंगरूळपीर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये काल दि.१० रोजी दुपारी दोन वाजता आढावा बैठक उत्स्फूर्तपणे पार पडली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिम मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डी आर डी चे प्रकल्प समन्वयक गणेश कोवे, गटविकास अधिकारी श्रीराम कुळकर्णी, गट विकास सहाय्यक अधिकारी केशव साखरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सी.ई.ओ.वैभव वाघमारे म्हणाले, जिल्ह्यात महाआवास योजना अत्यंत प्रभावी व पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ६३ हजारावर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत यापैकी १० एप्रिल २०२५ पर्यंत ६ हजार २०० घरकुलांची कामे प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचे ४४ हजार ६५९ आणि रमाई आवासचे १९ हजार ५६ असे एकूण ६३ हजार ७१५ घरकुलांना या वर्षीच्या कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. तसेच याशिवाय इतरही योजनांमधून घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. विशेष: बौद्ध व अनुसूचित जाती समूहांच्या लाभार्थ्यांकरीता राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेसाठी तब्बल १९ हजार५६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुलाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. यासाठी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा या विभागाची टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. या विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केल्यास या कामाला गती येईल आणि ग्रामिण भागातील लोकांचे घरकुलाचे स्वप्नही साकार होईल. त्यामुळे घरकुलाचा लाभ देताना एकाही लाभार्थ्यास त्रास होणार नाही आणि त्यांना वेळेत हप्ते मिळतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना सीईओ वाघमारे यांनी या विभागाशी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात १ जानेवारी, २०२५ ते दिनांक १० एप्रिल २०२५ या १०० दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे संचलन भाऊराव बेलखेडकर तर आभार बाळकृष्ण अवगण यांना मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
वैभव वाघमारे, सीईओ, जिल्हा परिषद, वाशीम यांनी जनतेला सांगितले की सदर प्रकरणात कोणीही
पैसे मागितल्यास तत्काळ कारवाई होणार.
* घरकुले मंजूर करताना व घरकुलाचे विविध हप्ते मंजूर करताना कोणालाही कोणतेही पैसे द्यावयाची गरज नाही. शासनाचे कोणतेही काम करण्यास शासकीय फीच्या व्यतिरिक्त घरकुलासाठी कुणीही एखादी व्यक्ती पैशाची मागणी करत असल्यास चित्रफीत काढून पुराव्यांसह तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करावी.दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.