महाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान

15.60 लाखाच्या दारूवर चालविला बुलडोजर

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते.

15.60 लाखाच्या दारूवर चालविला बुलडोजर

 

प्रतिनिधी : राजन बोरकर गडचिरोली

गडचिरोली दि.29: गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते.


त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्रातील अवैध दारु विक्री करणा-यांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्याअनुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्रांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवाई दरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. यावरुन पोस्टे गडचिरोली येथे दाखल एकुण गुन्हयांमधील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल २8 मार्च २०२५ रोजी नष्ट करण्यात आला.

न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल २8 मार्च २०२५ रोजी पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु.के. चौधरी यांच्यासह पोस्टे गडचिरोली हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्रांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात देशी दारुच्या 9० मिली मापाच्या १४ हजार २७ प्लॉस्टीक बॉटल, विदेशी दारुच्या २ हजार मिली मापाच्या ५५ प्लॉस्टीक बॉटल, विदेशी दारुच्या ७५० मिली मापाच्या २9 काचेच्या बॉटल, विदेशी दारुच्या ३७५ मिली मापाच्या ७१ काचेच्या बॉटल, विदेशी दारुच्या १8० मिली मापाच्या ७०9 काचेच्या बॉटल, विदेशी दारुच्या 9० मिली मापाच्या ४9 काचेच्या बॉटल, बियरच्या ६५० मिली मापाच्या ०9 काचेच्या बॉटल, बियरच्या ५०० मिली मापाच्या २8७ टिनाचे कॅन याप्रमाणे एकुण १५ लाख ६० हजार १9४ रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने १५ बाय १५ फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड्यात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोनि. रेवचंद सिंगनजुडे व पोहवा चंद्रभान मडावी यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button