संकटात सापडलेल्या मिरची कामगारांच्या मदतीस धावले सत्यसाई सेवक
चाय, नास्ता भोजनाचीही केली व्यवस्था

संकटात सापडलेल्या मिरची कामगारांच्या मदतीस धावले सत्यसाई सेवक
चाय, नास्ता भोजनाचीही केली व्यवस्था
गडचिरोली प्रतिनिधी : राजन बोरकर
गडचिरोली – संकटात सापडलेल्या प्राणीमात्रांना मदत करा या सत्यसाई बाबा यांच्या वचनानुसार काल रात्रीपासून चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालनजीक अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील २३ महिला – पुरूष व ६ लहान बालकांच्या मदतीस सत्यसाई सेवकांनी धाव घेऊन त्यांच्यासाठी चाय, नाश्ता तसेच जेवणाची व्यवस्था केली.
काल दिनांक २८ मार्च रोजी शुक्रवारी मध्य प्रदेश मधील दिंडोरी जिल्ह्यातील दामितीत्राही गावचे मजूर तेलंगणा राज्यातून मिरच्या तोडून परत येत असताना त्यांच्या वाहनाचे बेरिंग तुटल्यामुळे चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयानजीक येथे काल रात्री पासून अडकून पडले होते. यामध्ये एकूण २३ पुरुष व महिला तसेच ६ लहान बालकांचा समावेश होता. रात्रीपासून भूकेने व्याकुळ झालेल्या मजुरांची तसेच त्यांच्या बालकांची विदारक स्थिती निदर्शनास येताच सत्यसाई सेवकांनी लागलीच सकाळी ७ वाजता सर्वांना चहा आणि बिस्कीट देण्यात आले. सकाळी ८.३० वाजता आलू पोह्याचा नाश्त्या देण्यात आला आणि दुपारी १ वाजता त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.यामुळे मजुरांनी सत्यसाई सेवकांचे मनापासून आभार मानले.
या सेवेत साई युथ आणि ज्येष्ठ साई सेवकांचे सहकार्य लाभले. त्यांना नाश्ता वितरित करतांना श्री सत्यसाई सेवा संघटना, महाराष्ट्र (पूर्व) चे राज्याध्यक्ष मनीष समर्थ हे सुद्धा सेवेसाठी उपस्थित होते.