आता गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन जिल्हाधिकारी कार्यालयात जलरथा’चे उद्घाटन संपन्न
आता गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन जिल्हाधिकारी कार्यालयात जलरथा’चे उद्घाटन संपन्न

आता गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन जिल्हाधिकारी कार्यालयात जलरथा’चे उद्घाटन संपन्न
*महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या प्रचार – प्रसारासाठी भारतीय जैन संगठन चा पुढाकार*
*गडचिरोली* : महाराष्ट्र शासनाच्या *‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’* तसेच *‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’* या योजनेचा गडचिरोली जिल्ह्यात गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जन जागृतीसाठी करणार्या जलरथा चे आज २५/०४/२०२५ ला सकाळी. ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केले गेले
जल प्रचार रथ चे उद्घाटन *जिल्हाधिकारी श्री अविष्यांत पांडा* यांच्या शुभ झाले
या वेळी अमीत राऊत साहेब जलसंधारण अधिकारी, भारतीय जैन संगठन चे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा चंद्रपुर, डॉ गणेश जैन, निरज बोथरा व जिल्हा चे अधिकारी पदाधिकारी उपस्थिती होते
सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावां मधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे.
गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संगठन (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे. यामध्ये या जल रथाचा प्रसार करण्यासाठी सुहाना स्पाइस यांनी स्पॉन्सरशिप दिली
या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड ॲप’ वर ऑनलाइन भरावा. बीजेएस ने गढ़चिरोली जिल्ह्या साठी नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक राजन बोरकर (9689244672) तसेच महाराष्ट्रातील बीजेएस चे हजारो कार्यकर्ते हे बिजेएस च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामपंचायतींना, तालुका, जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहे।
या योजनेच्या जनजागृतीसाठी सुहाना स्पाइसेस यांनी बिजेएसला सहकार्य केले आहे योजनेची सर्व माहिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार म्हणजेच ‘www.shiwaar.com’ या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीजेएसचे पदाधिकारी गढ़चिरौली जिल्हा वॉटर डिस्ट्रिक्ट हेड महेद्र मंडलेचा चंद्रपुर, सह डिस्ट्रिक्ट हेड निरज बोथरा, डॉ गणेश जैन, सिध्दार्थ बैद गढ़चिरोली, विनोद जेजाणी वडसा, ईलेश गांधी चामोर्शी,
जिल्हा समन्वयक राजन बोरकर यांनी केले आहे