बंद असलेल्या मार्कंडेष्वराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला गती द्या शिष्ट मंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
बंद असलेल्या मार्कंडेष्वराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला गती द्या शिष्ट मंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बंद असलेल्या मार्कंडेष्वराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला गती द्या
शिष्ट मंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी दि.2: विदर्भाची काशी म्हणुन ओळख असलेल्या मार्कडेश्वर मंदीराचे जिर्णाेद्धार काम गेले दहा वर्ष रेंगाळत होते ते काम गेल्या मार्च २०२४ मध्ये सुरू झाले. पण ते काम संथ गतीने सुरू होते ते काम सध्या विविध कारणाने बंद आहे ते काम पूर्ववत सूरु करुन कामाला जलद गती द्यावी अन्यथा जिल्हाभर नागरिकात जनजागृती केल्यानंतर मार्कडा येथे आमरण उपोषण करणार आहे यासाठी जिल्हाधकाÚयांना मार्कंडेश्वर जिर्णाेद्धार समितिचे संत मुरलीधर महाराज यांच्या सह शिष्टमडळाने निवेदाद्वारे २ एप्रिल रोजी मागणी केली आहे.
मार्कडेश्वर देवस्थान जिर्णाेद्धार समितीचे संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात समितीच्या शिष्मंडळाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची भेट घेतली. त्यावेळी गोविंद सारडा, प्रमोद भगत, विजय कोमेरवार रितेश पालारपवार, दिपंकर मंडल, मनोज हेजिब, नामदेव किन्हेकार, मारोती उमलवार, मुखरू शेंडे, अजित भोयर, रामुजी महाराज हे उपस्थित होते. गेल्या नऊ दहा वर्षांपासून जिर्णाेद्धार काम रेंगाळत होते त्यासाठी, २9 जानेवारी २०२४ निवेदन दिले होते. काम सुरू झाले नाही म्हणून अखेर १६ फरवरी २०२४ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, व त्याच दिवसापासून मार्कंडा येथे उपोषण सुरू केले होते. अखेर प्रशासन, व शासनाने दखल घेत १ मार्च रोजी जिर्णाेद्धार कामाला सुरुवात झाली मात्र हे काम जलद गतीने न करता संथ गतीने सुरू होते त्यासाठि सतत पाठपुरावा केला असून कामाला गती द्या यासाठी १२ ऑगस्ट रोजी निवेनाद्वारे मागणी केली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ते काम तसेच सुरू असताना होळी दरम्यान मजूर आपल्या गावी गेले व मार्च एडींग असल्यामुळे म्हणून काम बंद असल्याचे संबधित भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी सांगितले त्यासाठी यावर चर्चा करण्यासाठी २३ मार्च रोजी मार्कडा येथे बैठक घेण्यात आली त्यानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिर्णाेद्धार काम जलद गतीने सुरू व्हावे यावर चर्चा करून भविष्यात उपोषणाची पाळी येऊ नये यासाठी दखल घ्यावी असेही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावर जिल्हाधिकारी अविशांत पांड्या यांनी जिर्णाेद्धार कामाला गती देण्यासाठी मी प्रयत्न करीन व सौंदयीकरणाचे काम करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.