चिचडोह प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना अखेर मिळाला योग्य मोबदला
चिचडोह प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना अखेर मिळाला योग्य मोबदला

चिचडोह प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना अखेर मिळाला योग्य मोबदला
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले अखेर यश
गडचिरोली प्रतिनिधी : राजन बोरकर
चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज ची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी चामोर्शी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले त्या शेतकऱ्यांनी याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मागणी केली.गडचिरोली विधानसभेचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी या शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेतला व या मागणीचा सातत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. आणि कोणत्याही परिस्थितीत मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास दिला. त्यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची भेट घेवुन अधिग्रहित जमिनीच्या शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली अखेर डॉ. देवराव होळी यांच्या या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने चिचडोह बॅरेज सिंचन प्रकल्पासाठ जमीन अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम मंजूर केली . व आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा परिचय दिला. शेतकऱ्यांच्या खात्यात योग्य मोबदल्याची रक्कम जमा होताच त्यांनी आनंद व्यक्त केला. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले व या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या व एका हाकेवर मदतीसाठी धावून जाणारे माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे विशेष आभार मानत त्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी शेतकरी अशोक धोडरे, प्रदीप साखरे, राजेंद्र धोडरे दिलीप चलाख, जैराम चलाख उपस्थित होते.
माजी आमदार डॉ. देवराव होळी हे नेहमीच संवेदनशीलपणे आपल्या मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत असतात. आज त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे कौतुक केले आहे.