जामखेड येथे भीमजयंती ला लोटला सर्व धर्मीय जन समुदाय
जामखेड येथे भीमजयंती ला लोटला सर्व धर्मीय जन समुदाय

जामखेड येथे भीमजयंती ला लोटला सर्व धर्मीय जन समुदाय.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधि रमेश धोत्रे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सिद्धार्थ नगर, मिलिंद नगर, समता नगर येथून भव्य मिरवणुकीला सुरवात झाली सर्व शासकीय कार्यायांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले संविधान चौक व खर्डा चौक येथे शहारातील सर्व नागरिकांनी महामानवास नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी प्राध्यापक विकी घायतडक, संतोष गव्हाळे, संभाजी आव्हाड,प्रा.सुनील साळवे, प्रकाश सदाफुले, यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष रमेश धोत्रे, जामखेड तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव, मच्छिंद्र येवले, मच्छिंद्र पवार, राजू शेलार, गोवरधन जाधव यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नगर सेवक मोहन पवार, महेश निमोनकर, सूरज दादा पवार यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले