कडूस चे रामभाऊ म्हाळगी विद्यालय तालुका स्तरावर तृतीय गुणवत्ता संवर्धन अभियान
कडूस चे रामभाऊ म्हाळगी विद्यालय तालुका स्तरावर तृतीय गुणवत्ता संवर्धन अभियान

कडूस चे रामभाऊ म्हाळगी विद्यालय तालुका स्तरावर तृतीय गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये
राजगुरुनगर ता. २५ : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित गुणवत्ता संवर्धन; अभियानामध्ये कडूस (ता. खेड) येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयानेतालुका स्थरावर तृतीय क्रमांक पटकावला. रामभाऊ म्हाळगी विद्यालय हे उपक्रमशील विद्यालय असून अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यालयाचे खेळाडू विद्यार्थी चमकले आहे .
एनएनएमएस व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यालयाचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत दरवर्षी अनेक खेळाडू विद्यालयात घडतात .या वर्षात झालेल्या पोलिस भरतीत विद्यालयाचे ५ माजी विद्यार्थी भरती झाले.भौतिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या विद्यालयामध्ये योजक आणि बॉस या कंपनी च्या सीएसआर माध्यमातून अनेक कामे झाली आहे.
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. परसबाग,, सौर उर्जेचा वापर, सुसज्ज क्रिडांगण, आउटडोअर जिम, असून विविध वृक्षांची लागवड केलेली आहे. माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून बोलक्या भिंती, इमारतीचे रंगकाम केलेले आहे. या विद्यालयामध्ये गारगोटवाडी सायगाव कडूस, रानमळा, पानमंदवाडी, तुरकवाडी शेंडेवाडी आगरनाथा या गावांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्याध्यापक अनिल पोटे यांनी सांगितले.
पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक अनिल पोटे यांनी स्वीकारले
शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक गारगोटे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढमाले ,ज्ञानेश्वर धायबर, प्रकाश कालेकर, संजय जाधव पालक संघाचे अध्यक्ष चांगदेव ढमाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे बक्षीस स्विकारले.
अभियानामध्ये यश मिळविण्यासाठी अंजीनाथ केदार रामदास रेटवडे प्रवीण काळे दत्तात्रय येवले तानाजी काळेकर वैशाली काळे राजश्री ढमाले रोहिणी जावळे सविता भोजने प्रियांका ढवळे उषा पोटे योजक अभिजीत वाजे देविदास धायबर कालिदास लाडाने यांनी विशेष परिश्रम केले.शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.