मंगरूळपीर येथे जिजाऊ रथयात्रा नियोजनाबाबत मराठा सेवा संघाची बैठक संपन्न
मंगरूळपीर येथे जिजाऊ रथयात्रा नियोजनाबाबत मराठा सेवा संघाची बैठक संपन्न

मंगरूळपीर येथे जिजाऊ रथयात्रा नियोजनाबाबत मराठा सेवा संघाची बैठक संपन्न
मंगरूळपीर (दि.२): जिजाऊ रथयात्रा नियोजनाबाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षाची नियोजन सभा दि.२ रोजी स्थानिक शहापूर येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थान येथे पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले होते तर जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रा.योगेश निकस, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.येत्या १८ एप्रिल रोजी शहरात जिजाऊ रथयात्रेचे आगमन होणार असून याचे नियोजन व पूर्वतयारी बाबत उपस्थित मान्यवरांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले.तसेच या रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.