मेदनकरवाडी ग्रामपंचायतीकडून कचरयाची विल्हेवाट लावायची अजबच तर्हा
महामार्गावरील कचरा ठरतोय अपघातास निमंत्रण..

मेदनकरवाडी ग्रामपंचायतीकडून कचरयाची विल्हेवाट लावायची अजबच तर्हा.
महामार्गावरील कचरा ठरतोय अपघातास निमंत्रण..
विजयकुमार जेठे खेड-: राज्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणून चाकण शहराचा उल्लेख होत असतो अर्थात चाकण शहरालगत अनेक वाड्या आज स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून आपले अस्तित्व टिकवून ठेवून आहे,याचा उद्देश गावचा किंवा वाडीचा विकास व्हावा असा हेतू निश्चितच असेलही परंतु त्या पटित स्थानिक नागरिकांना तसेच रस्ते, पाणी,वीज , आरोग्य शिक्षण या सुविधा मिळणे किंवा स्थानिक ग्रामपंचायतीने त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे या साठी महाराष्ट्र राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना आरोग्या सारख्या गंभीर समस्येकडे मात्र नक्कीच दुर्लक्ष झाल्याचे हे वास्तववादी चित्र मात्र जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण होत असून या बाबत स्थानिक प्रशासन , तालुका प्रशासन, मात्र नक्कीच दुर्लक्ष करत असल्याने या महामार्गावरील वाढत असलेला कचरा वेळेत न उचलता नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करून नागरीकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे तसेच एखाद्या जीवघेण्या अपघातास कारण ठरल्यास त्याची जबाबदारी निश्चितच स्थानिक ग्रामपंचायतीवर येणार आहे याचे गांभीर्य ओळखून मेदनकरवडी ग्रामपंचायततीने एक तर हा कचरा वेळोवेळी उचलून न्यावा किंवा या कचरयला आग लागणार नाही याची काळजी घ्यावी.अशी मागणी या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे