मुख्यमंत्री माझी- शाळा सुंदर शाळा पुरस्काराने पोटी जि प शाळेचा सन्मान
मुख्यमंत्री माझी- शाळा सुंदर शाळा पुरस्काराने पोटी जि प शाळेचा सन्मान

मुख्यमंत्री माझी- शाळा सुंदर शाळा पुरस्काराने पोटी जि प शाळेचा सन्मान
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 मध्ये तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळा पोटी या शाळेचा नुकताच पारितोषिक, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन जिल्हा परिषद वाशिम चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैभव वाघमारे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -२ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात आले होते. जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत पारितोषिक प्राप्त शाळांचा गौरव समारंभ वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणी संपन्न झाला. विजेत्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचा मा. वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषद वाशिम चे शिक्षणाधिकारी मा.विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद सुरसे व मंगरुळपीर पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे श्रेय गुणवत्ता विकासासाठी झटणारे शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी , सर्व पालक वर्ग व शाळेला वारंवार सर्वतोपरी मदत करणारे गावकरी यांना जाते असे मत यावेळी पोटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद सुरसे यांनी व्यक्त केले.